मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'समजने वाले को इशारा काफी है'; भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

'समजने वाले को इशारा काफी है'; भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

एकनाथ शिंदे भाजपत येणार याबाबत त्यांचा विचारण्यात आलं होतं.

एकनाथ शिंदे भाजपत येणार याबाबत त्यांचा विचारण्यात आलं होतं.

एकनाथ शिंदे भाजपत येणार याबाबत त्यांचा विचारण्यात आलं होतं.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 21 जून : राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील (BJP leader Chandrakant Pati) यांनी काही नेत्यांसह आज पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेतील भुकंपानंतर घेण्यात आलेल्या या बैठकीत चंद्रकांत पाटील काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान समजने वाले को इशारा काफी है, असं म्हणत त्यांनी सूचक विधान केलं. सध्या आम्ही वेट अँड वॉच या भूमिकेत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

राज्यसभेत भाजपने तीन तर विधान परिषदेत 5 उमेदवारांच्या विजयानंतर आज भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) ट्विटबाबत चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी समजने वाले को इशारा काफी है, असा सूचक इशाराही दिला. सध्या आम्ही वेट अँड वॉच या भूमिकेत असल्याचंही ते म्हणाले.

'आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही' असं एकनाथ शिंदे म्हणाले आहे.

आणखी काय म्हणाले चंद्रकांत पाटील...

-ज्यांनी भाजपला मदत केली त्याबद्दल सर्वांचे आभार, त्यांच्या मदतीमुळेच यश शक्य झालं.

-महाविकास आघाडीच्या नाराज आमदारांनी विधान परिषदेत भाजपला मतदान केलं.

-यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांची हुशारी सिद्ध झाली. त्यांचंही महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्यावतीने देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन.

-विश्वासघात करून हे सरकार स्थापन झालं. त्यानंतर पहिल्या महिन्यातच आमदारांनी याला विरोध केला होता. भाजपला धडा शिकवण्यासाठी बाहेर पडल्याचं सांगून आमदारांची समजूत काढण्यात आली. याचा परिणाम आज घडल्या त्या घटनांमधून दिसून येतो.

-पहिल्या दिवसापासून अनेक आमदारांच्या मनात ही खदखद होती. ती आता दिसत आहे.

-राज्यसभा निवडणूकित दोन जागा लढवा असा प्रस्ताव आला होता. आम्ही त्यांना म्हणालो विधान परिषदेला आम्ही पाचवी जागा लढत नाही असा प्रस्ताव त्यांना दिला

-राज्यसभेला 123 आमदारांनी भाजपला मतदान केले. आणि परिषदेला 134 आमदारांनी मदत केली

First published:

Tags: BJP, Chandrakant patil, Eknath Shinde