मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आपल्याच आमदारांवर विश्वास नसलेलं हे इतिहासातील पहिलं सरकार', आवाजी मतदानाच्या निर्णयावरुन फडणवीसांचा निशाणा

'आपल्याच आमदारांवर विश्वास नसलेलं हे इतिहासातील पहिलं सरकार', आवाजी मतदानाच्या निर्णयावरुन फडणवीसांचा निशाणा

"हे सरकार घाबरलेलं सरकार आहे. आपल्याच आमदारांवर विश्वास नसलेलं हे इतिहासातील पहिलं सरकार आहे", असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला.

"हे सरकार घाबरलेलं सरकार आहे. आपल्याच आमदारांवर विश्वास नसलेलं हे इतिहासातील पहिलं सरकार आहे", असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला.

"हे सरकार घाबरलेलं सरकार आहे. आपल्याच आमदारांवर विश्वास नसलेलं हे इतिहासातील पहिलं सरकार आहे", असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 22 डिसेंबर : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) आजपासून मुंबईत (Mumbai) सुरु झालं आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस आज प्रचंड गाजला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संध्याकाळी विधान भवन परिसरात पत्रकार परिषद घेऊन आजच्या अधिवेशनातील घडामोडींवर भूमिका मांडली. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही यावेळी आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला आहे. पण याच निर्णयावर विरोधी पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. फडणवीस यांनी याच निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकार 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करते. पण आपल्या आमदारांवरच विश्वास नसलेलं हे सरकार आहे, असा घणाघात फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? "अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता जो प्रस्ताव आज मांडण्यात आला त्या प्रस्तावातून हे सरकार किती असुरक्षित आहे हे आपल्या सगळ्यांचा लक्षात आलं. गेल्या 60 वर्षांपासून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने झाली. अगदी जेव्हा विरोधी आणि सरकार पक्ष यांच्यात पाच ते सात मतांचा फरक होता त्यावेळेसही गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक झाली. पण 170 आमदार आमच्याकडे आहेत असं सांगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला नियम बदलून खुल्या पद्धतीने ही निवडणूक घेण्याची नामुष्की ओढावली आहे", अशी टीका फडणवीसांनी केली. "याचं कारण त्यांच्यातील जो असंतोष आहे. हा असंतोष इतका भयानक आहे की त्यांना खात्री आहे गुप्त मतदान पद्धतीने केलं तर त्यांचे आमदार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत असंतोष व्यक्त करतील. त्यांच्यावर नामुष्की येईल. म्हणून त्यांनी नियम बदलण्याचा घाट घातला आहे. हे करत असताना इतक्या घाईत हे सगळं करण्यात आलं आहे", असं फडणवीस म्हणाले. हेही वाचा : हफ्ता वसुलीचा बेत फसला, पोलीस बनून गेलेल्या तोतयाला टपरीवाल्यानं दाखवला हिसका "पहिल्यांदा नियम समितीच्या बैठकीत अहवाल तयार करण्यात आला. विशेष म्हणजे भाजपच्या नियम समिती सदस्यांना निमंत्रणच देण्यात आलं नाही. नियम समितीत त्यांचं बहुमत असतानाही त्यांनी भाजपच्या सदस्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. आज सभागृहात नियम समितीचा रिपोर्ट आणताना नियमानुसार दहा दिवसांचा कालावधी द्यायला पाहिजे होता. काही आक्षेप असतील तर पुन्हा नियम समितीची बैठक बोलावली पाहिजे. पुन्हा नियम समितीने त्यावर निर्णय केले पाहिजेत. त्यानंतर ते नियम पुन्हा सभागृहात सादर केले पाहिजेत. ही सगळी पद्धत डावलून चुकीच्या पद्धतीने अत्यंत घाईघाईने आवाजी मतदानाने हा अहवाल मंजूर करुन दहा दिवसांची मुदत एक दिवसांवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यासंदर्भात आम्ही पोल मागत होतो. पण पोलदेखील दिला गेला नाही. हे सरकार घाबरलेलं सरकार आहे. आपल्या आमदारांवर विश्वास नसलेलं हे इतिहासातील पहिलं सरकार आहे", असा घणाघात फडणवीसांनी केला. 'आम्ही शेतकऱ्यांची मागणी लावून धरली' "विजेच्या बाबतीत आम्ही लक्षवेधी मांडली. गावचे गाव बंद आहेत. पाण्याचे पंप बंद आहेत. मंत्री म्हणतात आम्हाला राज्य सरकार पैसे देत नाही. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापत आहेत. सरकार सांगतं थकबाकी वाढली. ते व्याजावर व्याज लावत आहेत. आज आम्ही शेतकऱ्यांची मदतीची मागणी लावून धरली. सकरकारने मान्य केलेली कर्जमाफी फसवी आहे. शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले ते मी वाचून दाखवले. दीड लाखात अख्खा जिल्हा यांनी मदत केली", असा दावा फडणवीसांनी केला. हेही वाचा : Oh no! पतंग उडवता उडवता तरुणही आकाशात उंच उडाला; पुढे काय घडलं पाहा Live video 'भास्कर जाधवांचे वर्तन लज्जास्पद' "या सभागृहाचा दुरुपयोग करण्यात आला. शिवसेना भास्कर जाधव यांचे वर्तन लज्जास्पद होते. पंतप्रधान जे बोलले नाही ते त्यांच्या तोंडी टाकले. त्यांनी जी नक्कल केली ती आक्षेपार्ह होती. हे वर्तन सहन होणार नाही. तुम्ही आमच्या नेत्यांचे अंगविक्षेप कराल, आम्ही सहन करु, असं होणार नाही", अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
First published:

Tags: Devendra Fadnavis

पुढील बातम्या