जाफना, 22 डिसेंबर : ख्रिसमस, न्यू इअर अगदी तोंडावर आहे. त्याची तयारी सुरू आहे. हे वर्ष संपलं आणि नवं वर्ष आलं की सर्वांना वेध लागतात ते संक्रांतीचे. संक्रांत म्हटलं की पतंग (Kite video) उडवणं आलं. संक्रांतीदिनी पतंग उडवण्याची तयारी खरंतर आतापासूनच सुरू होते. किती तरी मुलं डिसेंबरपासूनच पतंग उडवताना दिसतात. उंच आकाशात पतंग उडवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण जरा विचार करा, जर या पतंगीसोबत तुम्हीच उडाला तर काय होईल? (Man fly with kite) सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. पतंग उडवणारी व्यक्तीच पतंगीसोबत हवेत उडून जाणं म्हणजे तुम्हाला फक्त आश्चर्य नाही तर अतिशयोक्तीच वाटेल. पण आपण कल्पनाही करू शकत नाही अशी ही घटना प्रत्यक्षात घडी आहे. पतंग उडवता उडवता एक व्यक्ती स्वतःच पतंगीसोबत आकाशात उडून गेली. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. तर हा व्हिडीओ पाहा. SriLankaTweet नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना आहे श्रीलंकेतील जाफनामधील. व्हिडीओत पाहू शकता आकाशात उंचावर एक व्यक्ती पतंगाच्या दोरीला धरून लटकताना दिसते आहे. हे वाचा - VIDEO - बापरे बाप! महिलेने केसांमध्ये रबरऐवजी गुंडाळला चक्क जिवंत साप आणि… खाली लोक त्याच्याकडे पाहून ओरडत होते. आपला जीव वाचवण्यासाठी तोसुद्धा धडपड करत होता. पतंग थोडा खाली आल्यानंतर ती व्यक्ती खाली येण्याचा प्रयत्न करत होती. पण हवा येताच पतंग पुन्हा उंचावर जात होता. पाहता पाहता आकाशात तब्बल 30 फूट उंचावर ही व्यक्ती गेली. तिथं उपस्थित सर्वजण थक्कच झाले.
Dramatic video shows a youth swept into the air with a kite in Jaffna area.
— Sri Lanka Tweet 🇱🇰 (@SriLankaTweet) December 21, 2021
The youth was reportedly suffered minor injuries.pic.twitter.com/W0NKrYnTe6 #Kiteman #Kite #LKA #Jaffna #SriLanka
अखेर ही व्यक्ती दोरीवरून सरकत सरकत खाली आली आणि जमिनीजवळ पोहोचताच धाडकन उडी मारली. कसंबसं करून त्याने आपला जीव वाचवला. जमिनीवर येताच त्याच्यामध्ये उठण्याची ताकद नव्हती. काही लोक धावत त्याच्याजवळ त्याच्या मदतीसाठी येतात. हे वाचा - व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी पतंगबाजी करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.