उल्हासनगर, 22 डिसेंबर: पोलीस आणि पत्रकार बनून पान टपरी चालकाकडे हफ्ता मागायला ( went to extort money) गेलेल्या दोघांना टपरी चालकानं चांगलाच हिसका दाखवला आहे. पान टपरीमधून गांजा विकत असल्याचा आरोप करून संबंधित दोघेजण टपरी चालकाला हफ्ता मागत होते. पण टपरीत काम करणाऱ्या युवकाने याची माहिती टपरी मालकाला दिली असता, संबंधित तोतया पोलिसाचा बनाव समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तोतया पोलिसाला अटक (fake police got arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास उल्हासनगर पोलीस करत आहेत. विनोद भोईर आणि लव्ह सहानी असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. उल्हासनगर पोलिसांनी विनोद भोईर या तोतया पोलिसाला अटक केली आहे. तर लव्ह सहानी हा तोतया पत्रकार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद भोईर आणि लव्ह सहानी हे दोघेजण तोतया पोलीस आणि पत्रकार बनून एका पान टपरीवाल्याकडे हप्ता मागत होते. कॅम्प नंबर 2 भागात दादू पान टपरी आहे. इथे काम करणाऱ्या सुनील यादवकडे ‘तू पान टपरीमध्ये गांजा आणि गुटखा विकतो, त्यामुळे तुला हप्ता द्यावा लागेल’ अशी धमकी या तोतया पोलिसांनी दिली होती. हेही वाचा- प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनं चिमुकल्याचा घोटला गळा; अनैतिक संबंधातून काढला काटा यानंतर सुनील याने पान टपरी मालक दादू थोरात यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर दादू थोरात घटनास्थळी दाखल झाले. तुम्ही पोलीस आहात, तर आयकार्ड दाखवा, अशी मागणी दादू यांनी केली. आम्ही तुम्हाला आयकार्ड का दाखवू अशी दमदाटी तोतया पोलीस विनोदने केली. आपली लबाडी उघड होईल म्हणून दोघांनी दादू थोरतशी हुज्जत घालून झटापट केली आणि संधी मिळताच घटनास्थळावरून पोबारा केला. हेही वाचा- मित्रांनीच दिली नराधमला साथ, जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार या प्रकारानंतर टपरीचालक सुनील यादव याच्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आपण तोतया पोलीस असल्याचा कोणालाही संशय येऊ नये, खाकी पॅंट घालून पान टपरीवाल्यांकडे हप्ता मागत होता. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी विनोद भोईर याला अटक केली असून लव्ह सहानी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपींनी तोतया पोलीस आणि पत्रकार बनून आणखी किती जणांना लुटलं आहे? याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.