मुंबई, 21 जानेवारी : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा कार्यक्रम बंद करण्यात आला होता. परंतु ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ आता पुन्हा सुरू होणार आहे. 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना प्रत्यक्ष शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ सुरू केला होता.
मात्र राज्यात सत्तांतर झालं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं. यावेळी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी २०२० साली जानेवारी महिन्यात हा उपक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी सरकारची जागा शिंदे फडणवीस सरकारने घेतली आहे.
राज्य सरकार बदलताच ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ आता पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे तरुणांना पुन्हा एकदा शासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेआधी धक्कादायक प्रकार, एकाला अटक
एकनाथ शिंदेंची शरद पवारांसमोर जोरदार बॅटींग
‘मागच्या आठवड्यात मकरसंक्रांत झाली आहे. त्यामुळे सगळ्यांनीच गोड गोड बोलायचं आहे. तीनच दिवसांपूर्वी मी दावोसला जाऊ आलो. शरद पवार साहेब अनुभवी आहे, त्यांना माहिती आहे. कुणी काही म्हटलं तरी सुद्धा तिथून आपल्या राज्यासाठी भरपूर गुंतवणूक आणली आहे’ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादींच्या नेत्यांना सल्लावजा टोला लगावला आहे.
तसंच, यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत अमित शहा यांच्याकडेही सहकार क्षेत्राबद्दल मदत मागत असल्याचे सांगितलं आहे.
हे ही वाचा : पंकजा मुंडेंच्या बीडमध्ये कोण करतंय ढवळाढवळ? बावनकुळे म्हणाले…
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच व्यासपीठावर आले. पुण्यातील मांजरीमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 46 व्या सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं.