• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 10 जणांसह भाजपात गेले अन् नगरसेवक झाले, आता सेनेत घरवापसी करत उपमहापौर झाले!

10 जणांसह भाजपात गेले अन् नगरसेवक झाले, आता सेनेत घरवापसी करत उपमहापौर झाले!

'मला उपमहापौर व्हायचं स्वप्न नव्हतं पण मी उद्धव ठाकरे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून परत आलो'

  • Share this:
ठाणे, 18 मार्च :  जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक (Jalgaon Municipal Corporation Mayor Election) आज पार पडली. शिवसेनेनं (Shivsena) भाजपची (BJP) सत्ता उलथून लावण्यात पालिकेवर भगवा फडकावला आहे. अवघ्या 15 नगरसेवकांच्या बळावर सेनेनं आज पहिल्यांदा जळगाव महानगरपालिकेवर आपला महापौर निवडून आणला. जयश्री महाजन या महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या महापौर म्हणून निवडून आल्या तर भाजपमध्ये  बंडखोर करून सेनेत आलेले नगरसेवक कुलभूषण पाटील हे उपमहापौर म्हणून घोषित करण्यात आले. भाजपाच्या बंडखोर गटाचे नेतृत्व करणारे आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या कुलभूषण पाटील यांची उपमहापौर म्हणून निवड झाली. नगरसेवक म्हणून पहिल्याच वेळी निवडून आलेले कुलभूषण हे 2019 च्या निवडणुकीच्या वेळी सेनेत नाराज होऊन 10 नगरसेवकांसह पक्षांतर करत भाजपात प्रवेश केला होता आणि नगरसेवक म्हणून निवडून आले. पण भाजपात पण जेव्हा कुणी विचारेना तेव्हा मात्र शिवसेनाच बरी म्हणत बंडखोरी करत घरवापसी केली. सीते'पाठोपाठ 30 वर्षांनी 'राम'ही करणार भाजपात प्रवेश फक्त उपमहापौर व्हायचं म्हणून बंडखोरी केली का? या प्रश्नावर कुलभूषण पाटील यांच उत्तर होतं की, 'मला उपमहापौर व्हायचं स्वप्न नव्हतं पण मी उद्धव ठाकरे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून परत आलो. हे साहेबांनी दिलेलं घरवापसीचं गिफ्ट आहे.  मी परत सेनेत आलो कारण आम्हाला जे भाजपने सांगितलं तसं काही दिलं नाही. भाजप आमदारांनी अत्यंत वाईट वागणूक दिली म्हणून विचार केला आपलं घरच बरं. आणि आता जळगावची धुळगाव ही ओळख बदलायची आहे." अभिनेत्यानं दाखवलं जादुई कलषाचं आमिष; व्यवसायिकाला घातला कोट्यवधींचा गंडा जळगाव महानगरपालिकेत भाजपचे एकूण 57 आमदार होते. तर शिवसेना 15 तर एमआयएम चे 3 नगरसेवक असे एकूण 75 नगरसेवकीय पक्षीय बलाबल आहे. पण स्थानिक आमदार राजू भोळे यांच्या काम करण्याला कंटाळून नगरसेवकांनी अडीच महिन्यापूर्वीच ठरवलं होतं की, भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही. त्यातच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि जळगावचे असलेल्या गिरीश महाजनांनी या नाराज नगरसेवकांच म्हणणं ऐकून घेतलं नाही.  त्यामुळे जयश्री महाजन यांच्या पतींनी एक टीम तयार केली आणि कामाला लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत हे बंडखोर पोहोचले  आणि सत्ता स्थापनेकडे सेनेने वाटचाल केली. भाजपच्या 27 आणि एमआयएम च्या 3 अशा एकूण 30 नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेचा भगवा जळगाव महानगरपालिकेवर पहिल्यांदाच स्थापन करण्यात मदत केली.
Published by:sachin Salve
First published: