Home /News /national /

BREAKING : 'सीते'पाठोपाठ 30 वर्षांनी 'राम'ही करणार भाजपात प्रवेश

BREAKING : 'सीते'पाठोपाठ 30 वर्षांनी 'राम'ही करणार भाजपात प्रवेश

Arun govil will enter bjp : पुन्हा भाजपला 'राम' पावणार का?

    नवी दिल्ली, 18 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ही मोठी खेळी खेळल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. (Arun govil Ram will join BJP) रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. अयोध्येतील राम मंदिरामुळे देशभरात भाजपचं मोठं कौतुक केलं जात आहे, दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर हे 'राम' भाजपला पावणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हिंदी, भोजपूरी व्यतिरिक्त अनेक भाषांमध्ये अरुण गोविल यांनी काम केलं आहे. 1991 मध्ये म्हणजेच तब्बल 30 वर्षांनी रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकरणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती. त्यानंतर सीते पाठोपाठ तब्बल 30 वर्षांनी रामाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Ram will join BJP) दीपिका चिखलिया यांनी 1991 मध्ये भाजपच्या तिकिटातून वडोदरा येथे निवडणूक लढवली आणि जिंकली होती. भाजप प्रवेशाबाबत त्यांनी एक किस्सा शेअर केला होता. यानुसार गुजरातमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अरविंद त्रिवेदी यांची भेट झाली. त्यांनी मालिकेत रावणाची भूमिका साकरली होती. ते दीपिका यांना म्हणाले की, तुम्हाला आडवाणीजी शोधत आहे, त्यांना तुमचा नंबर हवा आहे. आडवाणींची भेट झाल्यानंततर त्यांनी भारतीय जनता पक्षात येण्याबद्दल विचारलं आणि मी राजकारणात जोडले गेले. हे ही वाचा-'ममता सरकारचा पराभव पक्का', मोदींचा दावा! 'खेला होबे' घोषणेलाही दिलं उत्तर त्यानंतर अरुण गोविल यांच्या पक्षप्रवेशानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे. पक्षश्रेष्ठी अरुण गोविल यांच्यावर काय जबाबदारी सोपवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ayodhya ram mandir, BJP

    पुढील बातम्या