मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अभिनेत्यानं दाखवलं जादुई कलषाचं आमिष; व्यवसायिकाला घातला कोट्यवधींचा गंडा

अभिनेत्यानं दाखवलं जादुई कलषाचं आमिष; व्यवसायिकाला घातला कोट्यवधींचा गंडा

अमरेश आणि त्याच्या मित्रांनी नेदुरामन यांना एका चमत्कारिक कलषाचं आमिष दाखवून फसवलं. हा कलश घरात येताच संपत्ती दुप्पट होते असा दावा त्यांनी केला होता.

अमरेश आणि त्याच्या मित्रांनी नेदुरामन यांना एका चमत्कारिक कलषाचं आमिष दाखवून फसवलं. हा कलश घरात येताच संपत्ती दुप्पट होते असा दावा त्यांनी केला होता.

अमरेश आणि त्याच्या मित्रांनी नेदुरामन यांना एका चमत्कारिक कलषाचं आमिष दाखवून फसवलं. हा कलश घरात येताच संपत्ती दुप्पट होते असा दावा त्यांनी केला होता.

    मुंबई 18 मार्च: प्रसिद्ध दाक्षिणात्य (Tamil Film Industry) अभिनेता जी. अमरेश (G. Amresh) याला आर्थिक फसवणूकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तमिळनाडूमधील व्ही. नेदुरामन (V. Neduraman) नामक एका व्यवसायिकाला त्यानं तब्बल 26 कोटी रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे अमरेश हा अभिनेत्री जयाचित्रा (Jayachitra) यांचा मुलगा आहे. त्यामुळं या प्रकरणी पोलिसांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे.

    टाईम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार, अमरेश आणि त्याच्या मित्रांनी नेदुरामन यांना एका चमत्कारिक कलषाचं आमिष दाखवून फसवलं. हा कलश घरात येताच संपत्ती दुप्पट होते असा दावा त्यांनी केला होता. अर्थात या कलषाच्या बदल्यात तब्बल तीन वर्ष ते व्यवसायिकाला फसवत होतं. या दरम्यान जवळपास 26.2 कोटी रुपये त्यांनी उकळले. अखेर तीन वर्ष पैसे देऊनही तो कलष न मिळाल्यामुळं संतापलेल्या व्यवसायिकानं अभिनेत्याविरोधात पोलीस तक्रार केली. दरम्यान झालेल्या चौकशीत हा सर्व प्रकार समोर आला. शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडे तक्रार नोंदवल्यानंतर अमरेश याला केंद्रीय गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. पोलिसांनी अमरेशला स्थानिक न्यायालयासमोर हजार केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    अवश्य पाहा - ‘माझ्याही घरावर ईडीनं धाड टाकावी’; मराठी दिग्दर्शक झाला रातोरात श्रीमंत

    30 वर्षीय अभिनेता जी. अमरेश यानं अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं असून, काही गाणीदेखील संगीतबद्ध (Music Composer) केली आहेत. 2010 मध्ये त्यानं नाने इलाय या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. संगीतकार म्हणून देखील तो काम करत होता. मोटा सिवा केट्टा सिवा, भास्कर -ओरु रास्कल आणि चार्ली चॅप्लीन 2 या चित्रपटांसाठी त्यानं काही गाणीही संगीतबद्ध केली होती.

    अवश्य पाहा - ‘OTT च्या कुबड्या वापरणार नाही’; जॉन अब्राहमनं ऑनलाईन चित्रपटांची उडवली खिल्ली

    वारंवार अशा घटना घडत असतात तरीही लोक अशा भूलथापांना फसतात याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून, सुशिक्षित लोक देखील अशा गोष्टींना फसतात याबाबत सोशल मीडियावर चर्चा होत आहे. अनेकांनी नेदुरामन यांचीही चूक असल्याचं म्हटलं आहे. ज्यांनी तीन वर्षे अशा लोकांना पैसे दिले. आजच्या आधुनिक युगात जिथं लोक मंगळावर जाण्याच्या गोष्टी करत आहेत, तिथं अशा पद्धतीनं जादुई कलश वगैरे बाबींवर लोक विश्वास ठेवतात आणि स्वतःची फसवणूक करून घेतात, हे धक्कादायक आहे. अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

    First published:

    Tags: Crime, Entertainment, Tamil actor, Tollywood