मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वडिलांनी घेतला गळफास तर मायलेकाचा दगडाने ठेचून खून, जंगलातआढळले एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह

वडिलांनी घेतला गळफास तर मायलेकाचा दगडाने ठेचून खून, जंगलातआढळले एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेहकोरोनाच्या आधी हे कुटुंब मुंबईत जाऊन उपजीविका भागवत होतं मात्र लॉकडाउननंतर ते गावी आले होते.

कोरोनाच्या आधी हे कुटुंब मुंबईत जाऊन उपजीविका भागवत होतं मात्र लॉकडाउननंतर ते गावी आले होते.

कोरोनाच्या आधी हे कुटुंब मुंबईत जाऊन उपजीविका भागवत होतं मात्र लॉकडाउननंतर ते गावी आले होते.

नांदेड, 06 डिसेंबर : नांदेड (nanded) जिल्ह्यातील भोकर (bhokar) तालुक्यातील टाकराळा गावाच्या जंगलात तीन मृतदेह (three dead body) आढळल्याने खळबळ उडाली आहे. मयत तिघे हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमायतनगर तालुक्यातील टेंभी या गावातील रहिवाशी असून त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत 46 वर्षीय शांतामन सोमाजी कावळे यांचा मृतदेह आढळून आला आहे. तर शेजारीच त्याची 40 वर्षीय पत्नी सीमा आणि 17 वर्षीय मुलगा सुजितचा मृतदेह आढळून आला आहे.

ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळू शकतं, चंद्रशेखर बावनकुळेंनी तोडगा सांगितला

या माय लेकरांच्या अंगावर दगडाने ठेचून मारल्याच्या खुणा आहेत. तर शांतामन यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. धक्कादायक म्हणजे, याच कुटुंबातील दुसरा मुलगा असलेला अभिजित हा देखील गायब आहे.

कोरोनाच्या आधी हे कुटुंब मुंबईत जाऊन उपजीविका भागवत होतं मात्र लॉकडाउननंतर ते गावी आले होते. अशी माहिती मिळतेय. गेल्या 5 ते 7 दिवसांपासून हे कुटुंब गावातून निघून गेल होते.

BOB Recruitment: उमेदवारांनो, अवघे 3 दिवस शिल्लक; बँक ऑफ बडोदामध्ये करा अर्ज

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. पाच ते सहा दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.   हे प्रकरण नेमकं काय आहे याचा तपास करण्याचे मोठे आव्हान तामसा पोलिसांसमोर आहे.

First published:
top videos

    Tags: Murder, Suicide