पंढरपूर, 2 डिसेंबर: सोलापूरचे भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध पंढरपूरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या शिक्षक-पदवीधर मतदान प्रक्रियेदरम्यान खासदार जय सिद्धेश्वर स्वामी हे पंढरपूर शहरातील द.ह. कवठेकर प्रशाळेत 430 क्रमांकाच्या मतदान केंद्रात थेट प्रवेश केला होता. या प्रकारावर राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा...आताशी कुठे झाली होती नवदाम्पत्याच्या आयुष्याची सुरूवात, क्षुल्लक वादानं केला घातसहायक निवडणूक अधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 171 (फ) आणि 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार, मतदान प्रक्रिया सुरू असताना कर्मचारी, उमेदवार प्रतिनिधी, निवडणूक निरीक्षक व मतदार याशिवाय कोणालाही निवडणूक केंद्रात जाण्याची परवानगी नसते. मात्र, तरी देखील सोलापूरचे भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी थेट मतदान केंद्रात प्रवेश केला होता. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसन आक्षेप घेत खासदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी दीपक साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
खासदार जय सिद्धेश्वर स्वामींनी केला हा दावा..
मतदान केंद्रास भेट देऊन योग्य पद्धतीने मतदान सुरू आहे का? हा पाहण्याचा अधिकार असल्याचा दावा खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी केला आहे. मतदान शांततेत चाललं आहे का नाही, मतदान केंद्रांवर कोविडचं पालन होत आहे की नाही हे पाहण्याचा अधिकार आहे, असं खासदार जय सिद्धेश्वर स्वामींनी म्हटलं आहे. आता त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप भाजपकडून कोणत्याही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
हेही वाचा...सामान्यांना नको आधी लोकप्रतिनिधींना द्या कोरोना लस, शिवसेना नेत्याची अजब मागणी'मीच देव आहे', असं वादग्रस्त वक्तव्य
दरम्यान, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोटला दर्शनासाठी कशाला जाता मीच देव आहे, असे वादग्रस्त वक्तव्य खासदार जयसिध्देश्वर स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलं होतं.
काही सूचना असल्यास आमदार प्रशांत परिचारक यांच्या कानात सांगा म्हणजे देवाला सांगितल्याप्रमाणे आहे. असे विधान त्यांनी केलं होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.