मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ऑनलाईन दसरा मेळावा पडला महागात! पंकजा मुंडेंसह भाजप नेत्यांवर गुन्हा

ऑनलाईन दसरा मेळावा पडला महागात! पंकजा मुंडेंसह भाजप नेत्यांवर गुन्हा

यंदा कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा घेत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

यंदा कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा घेत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

यंदा कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा घेत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

बीड, 26 ऑक्टोबर: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ऑनलाईन दसरा मेळावा घेणं महागात पडण्याची शक्यता आहे. अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा यांच्यासह उभय नेत्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भादंवि 188, 269, 270 सह कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पंकजा मुंडे, खासदार भागवत कराड, महादेव जानकर, आमदार मोनिका राजुरे, आमदार मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरुड, संदेश सानप, राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे आणि इतर 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा..दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच भीषण अपघात! धडक बसताच दुचाकी जळून खाक, अन्.. दरम्यान, सावरगाव येथील भगवान गडाच्या पायथ्याशी पंकजा मुंडे दरवर्षी दसरा मेळावा घेत असतात. पण, यंदा कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा घेत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पंकजा मुंडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हिडीओ अपलोड करून सर्व समर्थक आणि भगवान भक्तांना महत्त्वाची सूचना केली होती. काय म्हणाल्या पंकजा मुंडे...? दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना वंदन करून पंकजा मुंडे यांनी दसऱ्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा देतानाच येत्या काळात केवळ भगवानगडच नाही तर मुंबईतील शिवाजी पार्क भरून दाखवायचं आहे. तिथे शक्तिप्रदर्शन करायचं आहे, अशी घोषणा पंकजा यांनी केली. मी घर बदलणार नाही, जिथे आहे तिथेच राहणार आहे. आता मी पक्षाची राष्ट्रीय मंत्री झाली आहे. पक्षाचे काम देशाच्या पातळीवर करणार आहे, असं सांगत पंकजा यांनी पक्ष सोडण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. पंकजांनी केली सूचक वक्तव्ये... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंकजा भाऊ मानतात. ठाकरे आणि मुंडे परिवाराचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. मात्र, एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पंकजा यांनी यावेळी बोलणं टाळलं. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर व मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंकजा यांना थेट पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती. त्यावर पंकजा यांनी आज कोणतंही भाष्य केलं नाही. मात्र, काही सूचक वक्तव्ये केली. शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क (शिवतीर्थ) अशी ऐतिहासिक परंपरा आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पंकजा यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी शिवाजी पार्कवर शक्तिप्रदर्शनाची इच्छा आपल्या कार्यकर्त्यांपुढे त्यांनी ठेवली. मला एकदा मुंबईतलं शिवाजी पार्क भरून दाखवायचं आहे, असे त्या म्हणाल्या. हेही वाचा..'खुर्चीसाठी हिंदुत्त्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये' धीर सोडू नका... विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल पुन्हा एकदा पंकजा यांनी बोलून दाखवलं, कार्यकर्त्यांना धीर सोडू नका, असं आवाहन पंकजा यांनी केलं. पक्षाचा विचारच मोठा असतो. कोणताही व्यक्ती पक्षापेक्षा मोठा होऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.
First published:

Tags: Beed, BJP, Pankaja munde, Parli

पुढील बातम्या