• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • विमान प्रवास करायचाय? 14 दिवस क्वारंटाइन झालं बंधनकारक; हे आहेत नवे नियम

विमान प्रवास करायचाय? 14 दिवस क्वारंटाइन झालं बंधनकारक; हे आहेत नवे नियम

लक्षणं असोत किंवा नसोत प्रवास करून आलेला प्रत्येकानं 14 दिवस घरात क्वारंटाईन राहणं महाराष्ट्रात बंधनकारक करण्यात आलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 मे : महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने विमान प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. लक्षणं असोत किंवा नसोत प्रवास करून आलेला प्रत्येकानं  14 दिवस घरात क्वारंटाईन राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सर्व प्रवाशांच्या हातावर स्टँप मारण्यात येईल आणि त्यांना आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करून अपडेट करावं लागणार आहे. फक्त अत्यावश्यक कामासाठी बाहेरगावी जाऊन लगेच परत येत असलेल्या प्रवाशांना होम क्वारंटाइनपासून सूट मिळेल. पण त्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाची माहिती पुराव्यासह द्यावी लागणार आहे. राज्यात आज देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आली. दिवसभरात 47 विमानं मुंबई विमानतळावरून सोडण्यात आली. 7 एअरलाइन्सनी 14 मार्गांवर ही सेवा दिली. पहिल्याच दिवशी 3752 प्रवासी मुंबईबाहेर गेले तर 1100 प्रवाशी शहरात उतरले. सर्वाधिक गर्दी मुंबई- दिल्ली विमानांसाठी नोंदवली गेली. लाइव्ह मिंट ने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या बातमीनुसार केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी (Aviation Minister Hardeep Singh Puri) यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, विमान प्रवास केल्यानंतर 14 दिवस क्वारंटाइन राहण्याची आवश्यकता नाही. ते म्हणाले की क्वारंटाइनच्या मुद्द्याला व्यावहारिक पद्धतीने पूर्ण करायला हवे. चाचणीमध्ये कुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला प्रवास करून दिला जाणार नाही. पण महाराष्ट्रात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आला आहे. लॉकडाऊन 4.0 : केवळ 3 प्रवाशांना घेऊन विमानानं केलं टेकऑफ एएआयने (Airports Authority of India) दिलेल्या माहितीनुसार विमानतळ संचालकांना प्रवासी टर्मिनलमध्ये येण्याआधीपासूनच योग्य प्रबंध आखणे गरजेचे आहे. तसच प्रवाशांनी विमानतळामध्ये जाण्याआधी थर्मल स्क्रिनिंग आवश्यक आहे. विमानतळाच्या संचालकांना प्रवाशांच्या सामानाच्या सॅनिटायझेशनसाठी देखील व्यवस्था करावी लागेल. AAI देशभरातील 100 हून अधिक विमानतळांचे व्यवस्थापन पाहते. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या मोठ्या विमानतळांचे व्यवस्थापन खाजगी कंपन्या पाहतात. (हे वाचा-लॉकडाऊनमध्ये सुरू करू शकता हा व्यवसाय, होईल लाखो रुपयांची कमाई) विमान उड्डाण सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांसाठी  प्रवासभाडे निश्चित करण्यात आले आहे. जेणेकरून विमान कंपन्या त्यांची मनमानी करणार नाहीत. दिल्ली, मुंबईहून 90 ते 120 मिनिटांच्या फ्लाइटचे प्रवासभाडे कमीत कमी 3,500 ते जास्तीत जास्त 10,000 असेल. 24 ऑगस्टपर्यंत हेच प्रवासभाडे असणार आहे. अन्य बातम्या कोरोना असूनही रुग्णालयात न जाता होम क्वारंटाइन झाले किरण कुमार; दिलं 'हे' कारण मोदी सरकारच्या 'या' एका घोषणेने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published: