• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • लॉकडाऊनमध्ये सुरू करू शकता हा व्यवसाय, होईल लाखो रुपयांची कमाई

लॉकडाऊनमध्ये सुरू करू शकता हा व्यवसाय, होईल लाखो रुपयांची कमाई

केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत मधमाशी पालनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी 500 कोटींचा निधी मंजूर केला आहे. जर तुम्ही देखील या क्षेत्रात व्यवसाय करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 मे : भारत जगभरातील मध उत्पादन (Honey Production) करणाऱ्या 5 सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. देशामध्ये मधाचे उत्पादन 2005-06 च्या तुलनेत 242 टक्क्यांंनी वाढले आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Agriculture Minister Of India Narendra Singh Tomar) शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार मधमाशी पालनाला प्रोत्साहन देत आहे. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत मधमाशी पालनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी 500 कोटींचा निधी मंजूर केला आहे. जर तुम्ही देखील या क्षेत्रात व्यवसाय करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. तुम्ही हनी हाऊस आणि हनी प्रोसेसिंग प्लँट करू शकता. 242 टक्के उत्पादन वाढले कृषीमंत्र्यांनी अशी माहित दिली की 2005-06च्या तुलनेत मधाचे उत्पादन 242 टक्क्यांनी वाढले आहे. तर मधाच्य निर्यातीत 265 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (हे वाचा-ग्राहकांना SBI चा इशारा! दुर्लक्ष केल्यास एक SMS करेल तुमचं बँक खातं रिकामं) कृषीमंत्र्यांनी असे म्हटले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हा पुरक व्यवसाय अत्यंत उपयोगी आहे. मधमाशी पालनाच्या प्रशिक्षणासाठी चार मोड्यूल बनवण्यात आले आहेत, ज्या माध्यमातून 30 लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सरकराकडून मिळेल ही मदत जर तुम्ही हनी प्रोसेसिंग प्लँट सुरू करू इच्छितात त्यांना खादी ग्रामोद्योग (KVIC) मदत करेल. KVICकडून तुम्हाला 65 टक्के कर्ज मिळेल आणि 25 टक्के सबसिडी देखील मिळेल. प्रकल्पासाठी लागणारे उर्वरित 10 टक्के गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल. KVIC नुसार जर तुम्ही वार्षिक 20 हजार किलोग्राम मध उत्पादन करण्याचा प्लँट सुरू करणार असाल तर याकरता जवळपास 24.50 लाख रुपयांचा खर्च येईल. (हे वाचा-व्याजदरात कपात तर आणखी 3 महिने EMI देण्यासाठी सूट, RBI च्या 6 मोठ्या घोषणा) याकरता तुम्हाला जवळपास 16 लाखाचे कर्ज मिळेल तर मार्जिन मनीच्या रुपात 6.15 लाख रुपये मिळतील. तर तुम्हाला 2.35 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. किती होईल कमाई? जर तुम्ही वार्षिक 20 हजार किलोचे मधाचे उत्पादन घेतले, ज्याची किंमत 250 रुपये प्रति किलो आहे, यामध्ये 4 टक्के वर्किंग लॉस सामाविष्ट केल्यास वार्षिक 48 लाख रुपयांची विक्री होईल. यामध्ये सर्व खर्च जो जवळपास 34.15 लाखाचा आहे तो वजा केल्यास साधारण वार्षिक 13.85 लाखांची कमाई होईल. म्हणजे महिन्याला 1 लाखांपेक्षा जास्त कमाई होऊ शकेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: