कोरोना असूनही रुग्णालयात दाखल न होता होम क्वारंटाइन झाले किरण कुमार; दिलं 'हे' कारण

कोरोना असूनही रुग्णालयात दाखल न होता होम क्वारंटाइन झाले किरण कुमार; दिलं 'हे' कारण

14 मे रोजी किरण कुमार (kirna kumar) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं.

  • Share this:

मुंबई, 25 मे : बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते किरण कुमार (Kiran Kumar) यांना कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झाली आहे. त्यांनी स्वत:च याबाबत माहिती दिली. मात्र कोरोना पॉझिटिव्ह असल्यानंतरही किरण कुमार रुग्णालयात दाखल झाले नाही तर त्यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाइन केलं आहे.

न्यूज 18 इंडियाशी बोलताना किरण कुमार यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांचं रेग्युलर चेकअप केलं होतं. त्याचवेळी त्यांच्या अनेक टेस्ट करण्यात आल्या. कोरोना टेस्टही त्यावेळी करण्यात आली. 14 मे रोजी त्यांना कोरोना असल्याचं निदान झालं. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाइन केलं.

किरण कुमार म्हणाले, "माझ्यामध्ये कोरोनाव्हायरसची कोणतीही लक्षणं नाहीत. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो नाही. माझं घर दुमजली आहे. त्यामुळे मी स्वत:ला घरातच क्वारंटाइन केलं आहे. तसंच माझ्या कुटुंबातील सदस्यांशीही मी जास्त संपर्कात येत नाही. त्यांच्यापासून दूरच राहतो"

हे वाचा - धक्कादायक! 22 वर्षीय अभिनेत्रीचं निधन, राहत्या घरातच सापडला मृतदेह

किरण कुमार यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत, तरी देखील त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या प्रकारामुळे किरण कुमार यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. किरण कुमार सध्या 74 वर्षांचे असून त्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सध्या आपली प्रकृती ठिक असल्याचंही किरण कुमार यांनी सांगितलं.

दरम्यान, किरण कुमार यांच्या आधी बॉलीवूडमध्ये अनेकाना कोरोनानाची लागण झाली आहे. सर्वात आधी सिंगर कनिका कपूर ही कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर निर्माता करीम मोरानी आणि त्यांच्या दोन्ही मुली जोआ मोरानी, शाजिया मोरानी कोरोना संक्रमित आढळल्या होत्या. आता सगळे कोरोनामुक्त आहेत.

हे वाचा - सोनू सूदला ट्रोल करण्याचा प्रयत्न फसला, अभिनेत्यानं युजरला दिलं सडेतोड उत्तर

First published: May 25, 2020, 7:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading