भारत कोरोनाव्हायरसचा नवा केंद्रबिंदू होणार, तज्ज्ञ डॉक्टरचा दावा

भारत कोरोनाव्हायरसचा नवा केंद्रबिंदू होणार, तज्ज्ञ डॉक्टरचा दावा

भारतात प्रत्येक आठवड्याला एक मोठा असा डोंगर तयार होतो आहे, जो कधीही भारतावर कोसळू शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मार्च : चीन, इटली आणि इराणनंतर भारत कोरोनाव्हायरसचा नवा केंद्रबिंदू बनू शकतो, अशी शक्यता देशातील एका तज्ज्ञ डॉक्टरने वर्तवली आहे. याचा अर्थ या देशांनंतर भारत कोरोनाव्हायरसमुळे सर्वात जास्त प्रभावित होणारा देश असेल. कारण इतर आशियाई देशांच्या तुलनेत भारतात यासाठी आवश्यक असलेली तयारी कमी आणि अपुरी आहे.

इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च सेंटरच्या अडवान्स रिसर्च इन वायरोलॉजी सेंटरचे माजी प्रमुख डॉ. टी. जॅकब जॉन यांनी ही शक्यता वर्तवली आहे. ब्लूमबर्गने याबाबत वृत्त दिलं आहे. डॉ. जॅकब जॉन यांच्या मते, भारतात प्रत्येक आठवड्याला एक मोठा असा डोंगर तयार होतो आहे, जो कधीही भारतावर कोसळू शकतो. आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या हळूहळू वाढते आहे. मात्र 15 एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या दहा ते पंधरा पटीने वाढेल. कारण देशात व्हायरसला आळा घालण्यासाठी उचलण्यात आलेली पावलं पुरेशी नाहीत.

LIVE Coronavirus Updates पुण्यात नवा रुग्ण सापडल्याने राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 42

भारतातील हवामान आणि लोकसंख्या हा व्हायरस पसरवण्यास पुरसं आहे. भारतात बहुतेक शहरांमध्ये एक तरी ठिकाण असं असतं, जिथं घरं आणि लोकांमध्ये खूप कमी अंतर असतं. अशावेळी कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका वाढतो.भारतात कोरोनाव्हायरस रुग्णांचा आकडा 147 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 42 रुग्ण आहेत. तर देशात तिघांचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

अरे देवा! ‘कोरोना’सह आता राज्यात माकड'ताप', दोघांचा मृत्यू

First published: March 18, 2020, 2:41 PM IST

ताज्या बातम्या