मुंबई, 18 मार्च : कोरोनामुळे जगभर हाहाकार उडाला आहे. क्रीडा क्षेत्रावरही याचा परिणाम झाला असून अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अनेक देशांमध्ये आणीबाणीची परिस्थिती आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. मात्र कोरोनामुळे दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर आफ्रिकेचा संघ मंगळवारी मायदेशी परतला. आता आफ्रिकेच्या संघाला खबरदारी म्हणून पुढच्या 14 दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलं आहे.
South African cricket team asked to self-quarantine for next 14 days after returning midway from ODI tour of India due to #COVID19 pandemic.
— Press Trust of India (@PTI_News) March 18, 2020
भारत-आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. 12 तारखेला धर्मशाळा इथं हा सामना होता मात्र पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतरचे उर्वरित दोन सामने लखनऊ आणि कोलकाता इथं होणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकाच रद्द करण्यात आली.
LIVE Coronavirus Updates पुण्यात नवा रुग्ण सापडल्याने राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 42
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकेतील उर्वरित दोन सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय याआधी बीसीसीआयने घेतला होता. त्यानंतर अखेर मालिका रद्द केली गेली. इंडियन प्रीमीयर लीगच्या (indian premier league) आयोजनावर कोरोना व्हायरसचं (Corona Virus) संकट उभे राहिलं होतं. IPL 2020 ही स्पर्धी पुढे ढकलण्याचा निर्णय BCCI ने घेतला. आता IPL 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपर्यंत पुढं ढकलण्यात आलं आहे. देशात कोरोना व्हायरस पसरत चालला आहे. यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने स्पर्धा आयोजित करण्याच्या बाजूने सरकार नसल्याचं म्हटलं होतं. परिणामी आयपीएल 2020 (IPL 2020) लांबणीवर पडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket