खबरदार! जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार कराल तर.. छगन भुजबळांचा इशारा

खबरदार! जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार कराल तर.. छगन भुजबळांचा इशारा

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पसरलेली रोगराई नियंत्रण करण्यासाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटी इतका निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च: कोरोना विषाणूने राज्यात थैमान घातलं असताना जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार तसेच संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा...इराणमध्ये अडकलेल्या 'त्या' 255 भारतीयांना कोरोना

भुजबळ म्हणाले, सध्यस्थितीत राज्यात कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा व जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब विचारात घेता जनतेचे दैनंदिन जनजीवन सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने जनतेस जीवनावश्यक वस्तु सहजासहजी व रास्तभावात उपलब्ध होणे सध्याच्या परिस्थितीत गरजेचे आहे.

दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा असल्याचे भासवून त्याचा साठा करणे व तो चढ्या भावाने विक्री करणे अशी परिस्थिती उद्‌भवल्याचे निदर्शनास येत असल्यास जीवनावश्वक वस्तु अधिनियम, 1955 व त्यानुसार निर्गमित इतर नियंत्रण आदेश तसेच जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 मधील तरतुदीनुसार साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार तसचे संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा...अरे देवा! ‘कोरोना’सह आता राज्यात माकड'ताप', दोघांचा मृत्यू

केंद्र शासनाच्या 13 मार्च, 2020 च्या अधिसूचनेन्वये जीवनावश्यक वस्तु अधिनियम, 1955 च्या परिशिष्टामध्ये कलम 2 ए अंतर्गत 'मास्क (2 प्लाई व 3 प्लाई सर्जिकल मास्क, एन-95 मास्क) व हँन्ड सॅनेटाइझर' यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आला आहे. याचा काळाबाजार व साठेबाजी करणाऱ्यावरही कठोर कारवाई करणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा..पुण्यात सापडला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा 42 वर

कोरोना आपत्तीसाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटींचा निधी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पसरलेली रोगराई नियंत्रण करण्यासाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटी इतका निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. बाधित जिल्ह्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य कार्यकारी समितीने घेतला आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोकण विभागासाठी 15 कोटी, पुणे विभागासाठी 10 कोटी, नागपूर विभागासाठी 5 कोटी, अमरावतीसाठी 5 कोटी, औरंगाबादसाठी 5 कोटी, नाशिक साठी 5 कोटी याप्रमाणे एकूण 45 कोटीचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.

First published: March 18, 2020, 2:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading