मुंबई, 27 एप्रिल : मुंबई- पुण्याबाहेर राज्यात Coronavirus चा धोका वाढतो आहे, असं आजच्या ताज्या आकडेवरून समोर आलं आहे. या दोन महानगरांखेरीज विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शहरांमध्ये कोरोनाचा विळखा आवळता जातो आहे, असं आजचे आकडे सांगतात. एका दिवसात राज्यात 522 नवे कोरोनारुग्ण सापडले आणि 27 जणांचा मृत्यू झाला. आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 8590झाली आहे आणि आतापर्यंत 369 जणांचा बळी गेला आहे. राज्यात आतापर्यंत 1282 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आजच्या नव्या कोरोनारुग्णांमध्ये औरंगाबादचा आकडा लक्षणीय आहे. एका दिवसात 30 कोरोनाबाधित रुग्ण या शहरात सापडले आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये आता 83 कोरोनारुग्ण झाले आहेत. दिवसभरात राज्यात झालेल्या 27 मृत्यूंपैकी सर्वाधिक 15 मुंबईत झाले असून अमरावती शहरातही 6 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे विदर्भात नागपूर आणि अमरावती कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहेत. पुणे महापालिकेत 4 कोरोनामृत्यूंची नोंद झाली. तर जळगाव आणि औरंगाबाद इथे प्रत्येकी एक जण मृत्युमुखी पडला.
522 new positive cases reported in Maharashtra today, 27 deaths recorded. Total number of #COVID19 positive cases in the state rises to 8590, total death toll stands at 369. 94 patients were discharged today after making full recovery, 1282 discharged till date: State Health Dept pic.twitter.com/h9MyJDthWW
— ANI (@ANI) April 27, 2020
दुसरीकडे देशातही कोरोनारुग्णांची संख्या गेल्या 24 तासात जास्त वाढली आहे. देशात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी आज देशातील मृत्यूंचा आकडा हा वाढला आहे. गेल्या 24 तासात 1,463 नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्यानंतर आता देशातील रुग्णांची संख्या 28,380 इतकी झाली आहे.
अन्य बातम्या
24 तासांत 60 मृत्यू! देशात आतापर्यंतचे दिवसभरातले सर्वाधिक बळी
पुण्यात धोका वाढला : कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये आता योजणार हा शेवटचा उपाय
सावधान! भारतात जुलै, ऑगस्टमध्ये पुन्हा होऊ शकतो करोनाचा उद्रेक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus