Home /News /pune /

पुण्यात धोका वाढला : कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये आता योजणार हा शेवटचा उपाय

पुण्यात धोका वाढला : कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये आता योजणार हा शेवटचा उपाय

निर्बंधांची कडक अंमलबजावणी करूनही पुण्यात गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे आता शेवटच्या पर्यायाची तयारी महापालिका करत आहे.

पुणे, 27 एप्रिल : मुंबईपाठोपाठ पुणे जिल्हाही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. निर्बंधांची कडक अंमलबजावणी करूनही पुण्यात गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णसंख्या 606 वरुन थेट 1319 वर पोहोचली आहे. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून अतिसंक्रमित भागातून नागरिकांना हलवण्याचा उपाय पुणे महापालिका योजत आहे. अतिसंक्रमित क्षेत्रातील लोकांना तात्पुरतं स्थलांतरित करण्याची महापालिकेची योजना असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. लॉकडाऊनच्या काळात निर्बंध अधिक कठोर केल्यानंतरही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पाहाणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकानेही चिंता व्यक्त केली होती. 7 दिवसांत रुग्णसंख्येत दुप्पट वाढ होत असून 9 पैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असल्याचं निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवलं आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्ण भवानी पेठ, कसबा पेठ, ढोले पाटील रस्ता या वॉर्डात झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली दाटीवाटीची वस्ती, छोटी घरं यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून कासेवाडी आणि इतर काही झोपडपट्टा भागात कोरोनाचे अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अशा हॉटस्पॉट्समधून नागरिकांचं स्थलांतर करण्याचा उपाय पालिका करणार आहे.तात्पुरत्या क्वारंटाइन सेंटरमध्ये त्यांची सोय करण्याची महापालिकेची तयारी आहे. संबंधित - पुण्यात आठवड्याभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ, 1300 वर गेला आकडा पहिल्या टप्प्यात 20000 लोकांना स्थलांतरित करण्याची तयारी महापालिका करत आहे. त्यासाठी पोलीस आणि वॉर्ड ऑफिसर यांच्यावर  जबाबदारी देणअयात येईल. पुणे पोलिसांनीच तात्पुरत्या स्थलांतराचा प्रस्ताव दिला आहे, असं समजतं. दाट लोकवस्तीमुळे लॉकडाऊनचा फायदा होईना, म्हणून स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यामधील रुग्णांमध्ये मुंबईच्या तुलनेत कमी वाढ होत असली तरीही लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता पुण्यात सध्या होणारी वाढही चिंतेचा विषय आहे. पुण्याच्या तुलनेत मुंबईतील लोकसंख्येची घनता कितीतरी अधिक आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. पुणे विभागात कोरोनाबाधित 1457 रुग्ण पुणे विभागातील 230 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1457 झाली आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात 1319 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 48 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. अन्य बातम्या घरी जाताना भावुक झाले तबलिगी; म्हणाले, डॉक्टरांनी आई-बापाप्रमाणे घेतली काळजी 'वर्षभरात लस येईपर्यंत Corona सामान्य तापासारखा होईल', शास्त्रज्ञांचा अंदाज पोलीस दादा, काळजी घ्या! राज्यातली धक्कादायक आकडेवारी समोर
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Coronavirus, Pune (City/Town/Village)

पुढील बातम्या