10 रुपये किलो दर करुनही मिळेना ग्राहक, अखेर जंगलात सोडल्या कोंबड्या

10 रुपये किलो दर करुनही मिळेना ग्राहक, अखेर जंगलात सोडल्या कोंबड्या

चिकनमुळे कोरोना व्हायरस होत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरल्याने पोल्ट्री व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

  • Share this:

वाशिम,6 मार्च: चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे सध्या महाराष्ट्रातही भीतीचं वातावरण पसरलं आहे. चिकनमुळे कोरोना व्हायरस होत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरल्याने पोल्ट्री व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. वाशिम जिल्ह्यातही ब्रॉयलर चिकनकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन त्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.

बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेऊन जगवल्या कोंबड्या...

मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील तेजस सानप यांनी मागील दहा वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांच्याकडे तीन हजार पाचशे पक्षी असून कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे ग्राहक मिळत नसल्यानं या शेतकऱ्याला 7 लाखांचा माल केवळ 90 हजारांत विकण्याची वेळ आली आहे. मात्र, त्या किमतीत ही ग्राहक मिळत नसल्याने तेजस सानप हताश झाले आहेत. तेजस सानप यांच्याकडील कोंबडीचं वजन 3 ते साडे तीन किलोपर्यंत झालं आहे.

हेही वाचा...तुम्हाला कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली तर... काय करायचं, कुठे जायचं जाणून घ्या

70 ते 80 रुपये प्रति किलो असलेले दर आता 10 रुपये करूनही त्यांच्यावर ग्राहक शोधण्याची वेळ आली आहे. मागील दोन दिवसांपूर्वी खाद्य नसल्याने 500 कोंबड्या जंगलात सोडून दिल्या होत्या. तसेच उर्वरित कोंबड्या जंगलात सोडण्याच्या विचारात होतो. मात्र, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेऊन कोंबड्यासाठी खाद्य आणलं व त्या आतापर्यंत जगवल्या आहेत. मात्र यापुढे पैसा नसल्यानं खाद्य आणणे शक्य होणार नाही. या कोंबड्यांना जंगलात सोडल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं तेजस सानप यांनी सांगितलं. पोल्ट्री व्यवसायावरच तेजस सानप यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे त्यांचा पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडल्यानं त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यांना यातून सावरण्यासाठी शासनस्तरावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा.. आता 'कोरोना'च माणसांना घाबरणार; हे कवच घातल्यावर व्हायरस जवळही येणार नाही

वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असल्यामुळे शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. मात्र, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करणारे शेतकरी कोरोना व्हायरससारख्या नव्या संकटांमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा.. धक्कादायक: फेसबुकवर अपलोड केले लहान मुलांचे लैंगिक फोटो आणि पॉर्न व्हिडीओ

First published: March 6, 2020, 6:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading