धक्कादायक: फेसबुकवर अपलोड केले लहान मुलांचे लैंगिक फोटो आणि पॉर्न व्हिडीओ

धक्कादायक: फेसबुकवर अपलोड केले लहान मुलांचे लैंगिक फोटो आणि पॉर्न व्हिडीओ

फेसबुकवर लहान मुलांचे लैंगिक छायाचित्र आणि पॉर्न व्हिडीओ अपलोड केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

  • Share this:

कोल्हापूर,6 मार्च:फेसबुकवर लहान मुलांचे लैंगिक छायाचित्र आणि पॉर्न व्हिडीओ अपलोड केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापुरात अशाच दोन वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून मोबाईल, सिमकार्ड व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गोरखधंदा करणारे आणखी काही संशयित सायबर पोलिसांच्या रडारवर आहेत.

मिळालेली माहिती अशी की, सोशल मीडियात चाईल्ड पोर्नोग्राफीचे प्रकार आता ग्रामीण भागात देखील वाढला आहे. लहान मुलांची अश्लील छायाचित्र तसेच व्हिडीओ काही जणांकडून अपलोड केली जात आहेत. यातून पैसा मिळवण्याचा अशा समाजकंठकांचा प्रयत्न आहे. मात्र, फेसबुकने अशा लोकांवर नजर ठेवायला सुरवात केली आहे. फेसबुक अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करण्याची माहिती पोलिसांना देत आहे. दर महिन्याला असा एक अहवाल सायबर विभागाच्या पोलीस महासंचालकांकडे सादर करण्यात येतो. त्यानुसार राज्यभरात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा..अर्धनग्न होईन भररस्त्यावर मनोरुग्णाचा राडा, दगडं घेऊन लागला मागे, पाहा हा VIDEO

कोल्हापुरात एका वेबसाईटचा वापर करून लहान मुलांचे लैंगिक फोटो आणि पॉर्न व्हिडीओ अपलोड केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. फेसबुकने दिलेल्या अहवालानंतर याप्रकरणी अमोल डिसोजा आणि विशाल आत्याळकर या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

चाईल्ड पोर्नोग्राफीच वाढलं प्रमाण

फेसबुकनं दिलेल्या अहवालानुसार राज्‍यभरात अशा 1600 प्रकरणाची चौकशी सायबर पोलीस करत आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 25 प्रकरणांचा समावेश आहे. तर चार प्रकरणाचे गुन्हे देखील दाखल झाले आहे. पुण्यात अशा 700 गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस करत आहेत.

हेही वाचा..पुण्यात इंटरनॅशनल सेक्स रॅकेट उघड, शिवाजीनगरच्या हॉटेलमध्ये एक महिला सापडल्याने बिंग फुटलं

कोल्हापूर सायबर पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केले तर आणखी काही जण रडारवर आहेत. 18 वर्षांखालील मुलांकडून असे प्रकार करून घेत समाज पोखरण्याचं काम काही समाजकंठक करत आहेत. मात्र अशा गुन्हेगारांवर आता खुद्द फेसबुकच लक्ष ठेऊन आहे.

First published: March 6, 2020, 5:40 PM IST

ताज्या बातम्या