मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आता 'कोरोना'च माणसांना घाबरणार; हे कवच घातल्यावर व्हायरस जवळही येणार नाही

आता 'कोरोना'च माणसांना घाबरणार; हे कवच घातल्यावर व्हायरस जवळही येणार नाही

चीनचे (China) आर्किटेक्ट दायोंग सुन (Dayong Sun) यांनी असं कवच तयार करण्याची योजना केली आहे, ज्यामुळे कोरोनाव्हायरस (Coronavirus) लोकांपर्यंत पोहोचणारही नाही.

चीनचे (China) आर्किटेक्ट दायोंग सुन (Dayong Sun) यांनी असं कवच तयार करण्याची योजना केली आहे, ज्यामुळे कोरोनाव्हायरस (Coronavirus) लोकांपर्यंत पोहोचणारही नाही.

चीनचे (China) आर्किटेक्ट दायोंग सुन (Dayong Sun) यांनी असं कवच तयार करण्याची योजना केली आहे, ज्यामुळे कोरोनाव्हायरस (Coronavirus) लोकांपर्यंत पोहोचणारही नाही.

बीजिंग, 06 मार्च : जगभरात दहशत निर्माण करणारा कोरोनाव्हायरस लवकरच माणसांना घाबरणार आहे. कारण चीनच्या एका आर्किटेक्टने अशा कवचाचं डिझाइन तयार केलं आहे, जे कवच घातल्यानंतर कोरोनाव्हायरस त्या व्यक्तीच्या जवळही जाणार नाही.

चीनचे (China) आर्किटेक्ट दायोंग सुन (Dayong Sun) यांनी वटवाघळांची रोगप्रतिकारक शक्ती आणि त्यांचे पंख यांचा अभ्यास करून एक असं कवच तयार केलं आहे, ज्यामुळे कोरोनाव्हायरस लोकांपर्यंत पोहोचणारही नाही. हे कवच फायबर फ्रेमवर थर्मोप्‍लास्टिक स्‍ट्रेचेबल मटेरिअलपासून (Thermoplastic Stretchable Material) तयार करण्यात आलं आहे, जे बॅगेप्रमाणे घालता येऊ शकतं. त्यानंतर फुग्याप्रमाणे  कवच व्यक्तीच्या चारही बाजूने पसरेल आणि सुरक्षा देईल.

संशोधकांच्या मते, वटवाघळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. उडताना त्यांच्या शरीराचं तापमान 40 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. त्यांचं मेटोबोलिझ्मही वेगवान असतं, ज्यामुळे हवेतील व्हायरस, बॅक्टेरियांमुळे त्यांना हानी पोहोचत नाही. दायोंग सुन यांनी सांगितलं की, कोरोनाव्हायरस 56 अंश सेल्सिअस तापमानात नष्ट होतात. या फायबर फ्रेममधील युवी लाइट्समुळे निर्माण होणाऱ्या गरमीमुळे कवचाच्या आतील तापमान वाढतं, ज्यामुळे कोरोनाव्हायरस जिवंत नाही राहत.

हे कवच म्हणजे सुपरहिरो बॅटमॅनच्या ड्रेसप्रमाणे डिझाईन करण्यात आलं आहे. सुपरहिरो म्हणजे मानवाच्या क्षमतेच्या मर्यादेपलीकडे असतात. त्यामुळे बॅटमॅनपासून प्रेरणा घेऊन हे कवच तयार करण्यात आलं आहे. शिवाय वटवाघूळही कोरोनाव्हायरसचे स्रोत असल्याचं म्हटलं दातं. त्यामुळे त्यांच्या पंखाप्रमाणे त्याचं डिझाइन करण्यात आलं आहे.

दायोंग यांनी सांगितलं की सध्या फक्त या कवचाचं डिझाइन तयार करण्यात आलं आहे. प्रत्यक्षात बनवण्याचं काम अद्याप सुरू केलेलं नाही.

सुन यांनी तयार केलेल्या या कवचात अल्ट्रव्हायोलेट लाइट  आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, युव्ही लॅम्प्स थेट त्वचेवर वापर करू नये. याच्या प्रकाशामुळे त्वचेला हानी पोहोचू शकते, त्वचेच्या समस्या बळावू शकतात. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, डिझाइनमध्ये अशी व्यक्ती दाखवण्यात आली आहे, जी कोरोनाव्हायरसच्या विळख्यात सापडली आहे.

First published:

Tags: China, Corona virus