कोविड रूग्णालयात महिलेवर सुरू आहे उपचार, तिकडे चोरट्यांनी घरावर मारला डल्ला

कोविड रूग्णालयात महिलेवर सुरू आहे उपचार, तिकडे चोरट्यांनी घरावर मारला डल्ला

कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिला महिलेच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

  • Share this:

सांगली, 12 जून: कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिला महिलेच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरट्यांनी 48 तोळे सोन्यांच्या दागिन्यांसह सुमोरे 23 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातल्या कदमवाडी येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा... शासनाचे आदेश डावलून परीक्षा घेणाऱ्या पुण्यातील 'त्या' शाळेविरोधात फौजदारी कारवाई

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कदमवाडी येथील एका महिलेस 4 जून रोजी कोरोनाची लागण झाली. या महिलेवर मिरज कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर या महिलेच्या कुटुंबासह त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भावकीतील इतर 22 जणांचे कवठेमहकाळ येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. कदमवाडी कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. महिलेच्या नातेवाईकांनाही कवठेमहांकाळ येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनसाठी जावे लागल्याने घरातील महिलांनी जवळील सोने पैसे घरातील एका पेटीत पर्समध्ये ठेवले होते. 4 जूनपासून त्यांचे घर बंद होते. या दरम्यान चोरट्यांनी महिलेच्या घरात डल्ला मारुन 48 तोळे सोन्याचे दागिने व वीस हजार यांची रोकड लंपास केली.

घराशेजारील व्यक्ती संबंधित कुटुंबाच्या गोठ्यातील जनावराना चारा घालण्यास गेली असता महिलेच्या घराचे कुलूप काढलेले दिसले. त्यांनी याची माहिती संबंधित कुटुंबास दिली आहे. नातेवाईकांनी तात्काळ कवठेमहांकाळ पोलिसांशी संपर्क साधला आहे.

हेही वाचा.. माओवाद्यांनी युवकाला गावाबाहेर नेऊन घातल्या गोळ्या, मृतदेहाजवळ टाकली चिठ्ठी

प्राथमिक तपासात घरातील एका पेटीत असलेल्या पर्समधील तब्बल 48 तोळे सोने व 20 हजार रूपयांची रोकड चोरीस केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

First published: June 12, 2020, 7:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading