Home /News /maharashtra /

माओवाद्यांनी युवकाला गावाबाहेर नेऊन घातल्या गोळ्या, मृतदेहाजवळ टाकली चिठ्ठी

माओवाद्यांनी युवकाला गावाबाहेर नेऊन घातल्या गोळ्या, मृतदेहाजवळ टाकली चिठ्ठी

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन माओवाद्यांनी एका युवकाची गोळ्या घालून हत्या केली आहे.

गडचिरोली, 12 जून: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन माओवाद्यांनी एका युवकाची गोळ्या घालून हत्या केली आहे. एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जांभिया) पोलिस मदत केंद्रांतर्गत किदरीटोला गावाजवळ ही घटना घडली आहे. रवी जुरु पुंगाटी असे मृत युवकाचे नाव आहे. तो गुंडाजूर येथील रहिवासी आहे. हेही वाचा..मोठी बातमी! राज्यात 1 लाख कोरोनाबाधित, 3500 हून जास्त दगावले तरी उघडल्या शाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रधारी काही माओवादी रवी पुंगाटीच्या घरी गेले होते. त्यांनी रवीला गावाबाहेर नेऊन गोळ्या घालून त्याची हत्या केली. माओवाद्यांनी त्याच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही टाकली आहे. रवी पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय असल्यानं त्याची हत्या केल्याचा उल्लेख या चिठ्ठीत केला आहेय या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात माओवाद्यांनी याच भागात वनपरिक्षेत्रातील कार्यालयाची तोडफोड करून जाळपोळ केली होती. एवढंच नाहीतर दोन वनरक्षकांना बेदम मारहाणही केली होती. एटापल्ली तालुक्यात गट्टा जांबिया येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात मध्यरात्री प्रवेश केला होता. माओवाद्यांनी कार्यालयात प्रवेश करुन दोन वन रक्षकांना बेदम मारहाण करुन मोबाईल हिसकावून नेले होते. या दोन्ही वनरक्षकांना लाठ्या काठ्या आणि बेल्टाने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोन्ही वनरक्षकांना गंभीर दुखापत झाली होती. कार्यालयातील वस्तूंची तोडफोड केली आणि दस्ताऐवजही जळून टाकले. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी हे कार्यालय माओवाद्यांनी जाळले होते. या घटनेमुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे. जंगलातली कामे कशी करायची असा सवाल वनविभागाच्या पुढे उपस्थितीत केला आहे. हेही वाचा...VIDEO: औरंगाबादमध्ये उद्योग मंत्र्यांच्या गाडीसमोरच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न माओवाद्यांची 2 कोटींची रसद रोखली 4 जून रोजी माओवाद्यांना तब्बल 2 कोटी 20 लाखांची रसद पुरवली जात असल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सिरोंचा लगत महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील तपासणीत 2 कंत्राटदारांकडून 2 कोटी 20 लाख रुपयाची रक्कम पोलिसांनी जप्त केली होती. तेंदूपत्ता कंत्राटराकडून 2 कोटी 20 लाख रुपये जप्तप्रकरणी माओवाद्यांना आर्थिक मदतीच्या संशयावरुन चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Gadchiroli

पुढील बातम्या