Home /News /pune /

शासनाचे आदेश डावलून परीक्षा घेणाऱ्या पुण्यातील 'त्या' शाळेविरोधात फौजदारी कारवाई

शासनाचे आदेश डावलून परीक्षा घेणाऱ्या पुण्यातील 'त्या' शाळेविरोधात फौजदारी कारवाई

शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुणे जिल्ह्यात परीक्षा घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    अंनिस शेख (प्रतिनिधी) मावळ, 12 जून: राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेण्यावरून वाद पेटला आहे. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुणे जिल्ह्यात परीक्षा घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. असा शाळेवर फौजदारी कारवाई करण्यात आली असून 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा.. मोठी बातमी! राज्यात 1 लाख कोरोनाबाधित, 3500 हून जास्त दगावले तरी उघडल्या शाळा कोरोना संकटाच्या काळात देशभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच अनेक परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या स्नेहवर्धक विकास मंडळ बाल विकास विद्यालयामध्ये इयत्ता अकरावी कॉमर्सच्या अनुतीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्याचे उल्लंघन करुन सुरु असलेल्या अकरावीच्या पुनर्परीक्षेवर प्रशासनाने अचानक छापा टाकून कारवाई केली आहे. मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती निवारण अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे संस्थेच्या संचालक मंडळ, प्राचार्य आणि संबंधित शिक्षक अशा एकूण चौदा जणांवर तळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे महाविद्यालयात एकूण 30 विद्यार्थ्यांपैकी 27 विद्यार्थी परीक्षा देताना चे पोलिसांना आढळून आले होते मागील दोन दिवसापासून शाळेत विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. हेही वाचा.. महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकणारी बातमी, कोरोनाची नवी आकडेवारी समोर मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना केलेल्या आवाहनानंतरही सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी करणाऱ्या शैक्षणिक संस्थेवरील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे. सर्वात आधी 'न्यूज18 लोकमत'ने ही बातमी प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत 14 जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या