मोठी कारवाई, 'त्या' कोरोनाबाधितांना आश्रय देणाऱ्या धार्मिक स्थळाच्या संचालकाविरुद्ध गुन्हा

मोठी कारवाई, 'त्या' कोरोनाबाधितांना आश्रय देणाऱ्या धार्मिक स्थळाच्या संचालकाविरुद्ध गुन्हा

आंध्र प्रदेशातील करनूल जिल्ह्यातील असलेल्या या आठ जणांचे दिल्ली कनेक्शन देखील समोर आले आहे.

  • Share this:

लातूर, 6 एप्रिल: निलंगा येथे आढळलेल्या आठ कोरोना पोजेटिव्ह रुग्णांना आश्रय देणाऱ्या धार्मिक स्थळाच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरियाणातून प्रवास करत लातूर जिल्ह्यात 12 जण पोहोचले होते. निलंगा येथील एका धार्मिक स्थळावर ते दोन दिवस आश्रयाला थांबले होते. त्यांच्यापैकी 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा..'लॉकडाऊन' बैलाला समजला मात्र नागरिकांना केव्हा समजणारा? व्हिडीओ व्हायरल

आंध्र प्रदेशातील करनूल जिल्ह्यातील असलेल्या या आठ जणांचे दिल्ली कनेक्शन देखील समोर आले आहे. एकाच दिवशी आठ जण पोझिटिव्ह आढळल्याने लातूर जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान ही बाब गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी या आठ जणांना आश्रय देणाऱ्या धार्मिक स्थळाच्या संचालका विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. यासोबतच जिल्ह्यात असे कोणी बाहेर जिल्ह्यतून अथवा राज्यातून किंवा विदेशातून आले असतील तर तात्काळ प्रशासनाला माहिती दया. भले तो एखाद्याचा मुलगा असला तरी त्यांच्या घरच्यांनी माहिती न दिल्यास पालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा कडक इशारा देखील जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिला आहे.

हेही वाचा..लातूरमधल्या 'त्या' कोरोनाबाधितांच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीने वाढवली बीडकरांची धाकधूक

बीड चेकपोस्टवर पोलिसांशी घातली होती हुज्जत...

देशात सर्वत्र लॉकडाऊन असताना आणि जमावबंदीचा आदेश लागू असताना 2 एप्रिल रोजी मध्यरात्री लातूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून तबलिगी जमातचे काही सदस्य लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे पोहोचले होते. यापैकी आठ यात्रेकरू कोरोनाग्रस्त असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

बीड चेकपोस्टवर पोलिसांशी घातली होती हुज्जत...

लातूरला जाणाऱ्या तबलिगी जमातच्या काही जणांनी बीड जिल्ह्यातील शहागड येथील चेकपोस्टवर पोलिसांशी हुज्जत घातली होती. तेथील पोलिस अधिकाऱ्यांशी त्यांनी बाचाबाची केली होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, पहाटे पोलिसांची नजर चुकवून तबलिगी जमातच्या सदस्यांनी नागझरीमार्गे लातूर गाठले होते.

हेही वाचा..जसलोक हॉस्पिटलमध्ये घुसला 'कोरोना', 5 नर्ससह 12 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

आता हुज्जत घातलेल्या बीडच्या पोलिसांचे स्वॅबही तपासले जाणार आहे. तब्बल 10 दहा पोलिसांचे स्वॅब नमूने घेतले जाणार आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासन आणि पोलिसाचं टेन्शन वाढलं आहे. खबरदारी म्हणून बीड प्रशासनाने चेकपोस्टवरील काही पोलिस, आरोग्य विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

उच्चस्तरीय चौकशी होणार

देशात लॉकडाऊनच्या काळात यात्रेकरूंना निलंगा येथील मशिदीमध्ये आश्रय देण्यात आला होता. खरेतर असे अनोळखी व्यक्ती आढळून येताच याची माहिती संबंधितांनी पोलिस, जिल्हा प्रशासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने द्यावयास हवी होती. याप्रकरणी मशीद आणि मशिदीचे कार्यवाह यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याने उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील सर्वच निष्पाप नागरिकांना धोका निर्माण करण्याचा प्रकार पुढे आला आहे. या घटनेची कठोर शब्दात निंदा करीत असल्याचे सांगून यापुढे जिल्ह्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रत्येकाने कायद्याचे कठोर पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.

हेही वाचा...मुंबईत 24 तासांत 7 मृत्यू; राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 868

First published: April 6, 2020, 10:09 PM IST

ताज्या बातम्या