'लॉकडाऊन' बैलाला समजला मात्र नागरिकांना केव्हा समजणारा? व्हिडीओ व्हायरल  

'लॉकडाऊन' बैलाला समजला मात्र नागरिकांना केव्हा समजणारा? व्हिडीओ व्हायरल  

काही ठिकाणी लॉकडाऊनचे नियम पाळले जात आहेत तर काही ठिकाणी पायदळी तुडवले जात आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

भिवंडी, 6 एप्रिल: संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूची दहशत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी लॉकडाऊनचे नियम पाळले जात आहेत तर काही ठिकाणी पायदळी तुडवले जात आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा...'भाजीपाला जनावरांना टाकू, पण आता शहरात नाही', अमानुष मारहाणीनंतर संतापले शेतकरी

भिवंडी तालुक्यातील अंजूर, सुरई गावचा हा व्हिडीओ आहे. संचारबंदीमुळे गावाची शिव बंद करण्यात आली आहे. त्यावेळी एक बैल गावात येत असताना त्याला तेथील नागरिकाने गावात प्रवेश बंद असल्याचे सांगताच बैल परत निघून जातो, असं या व्हिडीओत दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही काही नागरिक मोकाट फिरत आहे. त्यांना एका बैलाने चांगलीच चपराक दिल्याचे समोर येत आहे. 'लॉकडाऊन' बैलाला समजलं मात्र नागरिकांना केव्हा समजणारा? असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा...लॉकडाऊनमध्ये 'चेन्नई एक्स्प्रेस' चर्चेत, शाहरूखचा प्रसिद्ध डायलॉग VIRAL

मृतांचा आकडा 46 वर

दुसरीकडे, राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 46 वर पोहोचला आहे. अंबरनाथ येथे कोरोनाची लागण झालेल्या एका रुग्णाच सोमवारी मृत्यू झाला आहे. मुंबईच्या भाभा रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरु होते. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 791 वर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. रुग्णांचा आकडा 519 च्या रुग्ण आहेत. आतापर्यंत 56 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2020 04:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading