पुणे, 6 एप्रिल : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात Coronavirus चा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 19 नवे रुग्ण सापडले. पुण्यात आज 20 नवे रुग्ण वाढले. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार आता पुण्याचा पूर्व भाग पूर्णपणे सील करण्यात येणार आहे. पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या आदेशानुसार, पूर्व पुण्याचे भवानी पेठ, नाना पेठ, कासेवाडी, गुलटेकडी, पुणे स्टेशन परिसर हे भाग पूर्णपणे सील करण्यात येणार आहेत. या परिसरात कोरोनाव्हायरसचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेडचा धोका लक्षात घेऊन या परिसरातली वर्दळ पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. CoronaUpdates: मुंबईत आणखी धोका वाढला, 24 तासांत आढळले 57 कोरोनाबाधित नवे रुग्ण या परिसरात कुणालाही जाता येणार नाही. परिसरातल्या नागरिकांनीही घराबाहेर पडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. पुण्याचं मुख्य बाजारकेंद्र मार्केडयार्ड याच भागात आहे. दैनंदिन अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा सुरू राहावा म्हणून मार्केटयार्डचा परिसर या निर्णयातून वगळलेला आहे. आजही मोठा आकडा वाढण्याची शक्यता दोनच दिवसात पुण्यात रूग्णांची संख्या 38 वर पोहोचली. त्यामुळे पूर्व भागातला परिसर सील करायचा निर्णय घेतला. इथे कुणालाही जाता याणार नाही तिथून बाहेर पडता येणार नाही. आता या परिसरातल्या 100 टक्के लोकांना मास्क वापरणं बंधनकारक आहे. आज दाखल झालेल्या रुग्णांचे अहवाल येणं बाकी आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. नायडू हॉस्पिटल फुल्ल पुणे महापालिकेचं कोरोनाग्रस्तांच्या उपचाराचं मुख्य केंद्र बनलेलं नायडू हाॅस्पिटल पूर्ण भरलं आहे. तिथे एकही बेड रिकामा नाही. आता कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर बोपोडीमध्ये उपचार होतील. त्यानंतर सिम्बायोसिसच्या लवळे परिसरातल्या हाॅस्पिटलमध्ये उपचार केले जातील, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं. तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती! काही ठिकाणी Coronavirus तिसऱ्या स्टेजमध्ये
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.