मुंबई 06 एप्रिल : मुंबईत कोरोनाचा प्रकोप वाढतोच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ च्या आसपासचा संपुर्ण परिसर बीएमसीकडून आज तातडीने सील करण्यात आला आहे. बांद्र्याच्या प्रसिद्ध कलानगर मध्ये मातोश्री आहे. कलानगर बाहेर असलेल्या चहा विक्रेत्याची प्रकृतीची बिघडल्याने BMCने ही खबरदारी घेतली आहे. ही टपरी मातोश्री पासून हाकेच्या अंतरावर आहे. या संपूर्ण भागात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. पोलीस आणि पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मातोश्रीच्या गेट क्रमांक 2 जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचं रेस्ट हाऊस आहे. तिथेच ही चहाची टपरी आहे. मातोश्री, म्हाडाचं मुख्यालय ते साहित्य सहवास सोसायटीपर्यंत सर्व परिसर सील करण्यात आला आहे. बीएमसीने मात्र हा परिसर सील केल्याचं म्हटलेलं नाही तर फक्त तो विभाग सॅनिटाईझ केल्याचं म्हटलं आहे. मात्र आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी यासंदर्भात खात्री केली आहे. त्या परिसरात जे-जा करण्यास प्रतिबंध केल्याचं आढळून आलं आहे.
#Maharashtra: Media reports that area near Matoshree house in Mumbai is sealed is incorrect, BMC PRO says, routine sanitisation work was going on
— ANI (@ANI) April 6, 2020
कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ड्रायव्हरला सुट्ट दिली होती. ते स्वत:च कार चालवत बैठकांना उपस्थित राहत आहेत. भेटी गाठीही त्यांनी या आधीच बंद केल्या असून फक्त महत्त्वाच्या बैठकांनाच ते उपस्थित राहत आहेत. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहे. देशात लॉकडाउन असूनही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 693 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. काल दिवसभरात 30 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आज आत्तापर्यंत 2 मृत्यू नोंदले गेले आहेत. 24 तासांतल्या या 32 मृत्यूंमुळे भारतात कोरोनाबळींची संख्यासुद्धा 109 वर पोहोचली आहे. विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षेबाबत सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढलेला दिसतो. पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळाचीही कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाविषयी एक बैठक झाली. त्याबद्दलही अग्रवाल यांनी माहिती दिली. कौन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या बैठकीत पुढे काय उपाय योजायचे यावर चर्चा झाली. क्वारंटाइन विभाग, कुठल्या लक्षणांसाठी क्वारंटाइन विभागात दाखल करून घ्यायचं याविषयीचे नियम याविषयी बैठकीत चर्चा झाल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.वाचा - ‘मृत्यूंची संख्या वाढत आहे…आता तरी गांभीर्य ओळखा’, अजित पवारांचं आवाहन कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी पाहता ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला या विषाणूचा धोका जास्त आहे, हे स्पष्ट आहे. भारतात 63 टक्के कोरोनाबळींचं वय 60 पेक्षा अधिक होतं. पण त्याखालोखाल 40 ते 60 वयोगटालाही मोठा धोका आहे, असं आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसतं. 30 टक्के मृत्यू या वयोगटातल्या कोरोनाग्रस्तांचे झाले आहेत. 86 टक्के लोकांचा मृत्यू कोरोनाव्हायरसबरोबर इतर कुठला मोठा आजार असल्यामुळे झाला आहे, असंही आकडेवारी देत मंत्रालयाने स्पष्ट केलं.