मुंबई, 6 एप्रिल: मुंबईत कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातलं आहे. लॉकडाऊन असूनही कोरोन रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. सोमवारी 4 जणांचा मृत्यू झाला असून गेल्या 24 तासांत कोरोनाचे 57 नवे रुग्ण आढळले आहेत. एवढेच नाही तर 150 संशयीत रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दिलासादायक म्हणजे पूर्णपणे बरे झालेल्या 5 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, देशातील सर्वात जास्त कोरोनाचं रुग्ण असणारं पहिल्या क्रमाकांवरील राज्य आहे. एकट्या मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 519 आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त असल्यामुळे येत्या काळातही बीएमसीला अधिक कठोर पावलं उचलावी लागणार आहे. हेही वाचा.. सहाव्या नेगिटिव्ह टेस्टनंतर कनिका कपूरला डिस्चार्ज, डॉक्टरांनी केली ‘ही’ सूचना दुसरीकडे, संपूर्ण देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. देशभरात गेल्या 24 तासांत 693 कोरोनारुग्ण सापडले आहेत. देशात कोरोनाबळींची संख्या 109 वर पोहोचली आहे. देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्याचसोबत महाराष्ट्रातही कोरोनानं थैमानं घातलं आहे. तसंच सर्वाधिक जास्त रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळून आले आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारच्या पार गेला आहे. तर राज्यात आता 791 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हेही वाचा.. विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षेबाबत सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय दुसरीकडे, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या 24 तासांत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढलेला दिसत आहे. पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळाचीही कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाविषयी एक बैठक झाली. त्याबद्दलही अग्रवाल यांनी माहिती दिली. कौन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या बैठकीत पुढे काय उपाय योजायचे यावर चर्चा झाली. क्वारंटाइन विभाग, कुठल्या लक्षणांसाठी क्वारंटाइन विभागात दाखल करून घ्यायचं याविषयीचे नियम याविषयी बैठकीत चर्चा झाल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.