कल्याण, 5 सप्टेंबर: कल्याण शहरात गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 30 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना नगरसेवक आणि माजी सभापती यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत फेसबुक पोस्टवरून माहिती दिली आहे. हेही वाचा… पुण्यात कोरोनाबाबत कुठं चुकतेय रणनीती? शरद पवारांनी लावला बैठकांचा सपाटा कल्याण-डोंबिवलीत पुन्हा कोरोनाच कहर सुरू झाला असून गेल्या 3 दिवसांपासून 400 वरती रुग्ण समोर येत आहेत. तर एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी 30 हजारांवर गेली आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्के आहे हे समाधानकारक असलेतरी रूग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्याच्या तुलनेत 1.08 टकक्यांनी वाढले आहे. दुसरीकडे, कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 30 जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. कल्याणमधील जोशीबाग येथे एक 40 जणांचा परिवार गणेश उत्सवात आरतीसाठी एकत्र आला होता. त्यातील एका मुलाला लागण झाली. त्यातून पुढे 40 पैकी 30 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या वृत्ताला केडीएमसी अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दुजोरा दिला आहे. मृत्यूदर वाढला… कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा 30 हजार पार झाला आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्के आहे. ही बाब समाधानकारक असली तरी रुग्णांचं मृत्यू होण्याचं प्रमाण गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत 1.08 टक्क्यांनी वाढलं आहे. मृत्यूदर हा आधी 1.09 इतका होता आज हा दर 2.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, इतर महापालिकांच्या तुलनेत केडीएमसी परिक्षेत्रतील मृत्यूदर कमी असल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केला होता. तो आता फोल ठरताना दिसत आहे. हेही वाचा… …म्हणून 2021 मध्येही कोरोनाचा प्रकोप असणार, रणदीप गुलेरिया यांनी दिली माहिती नागरीकांना आणि डॉक्टरांना आवाहन वेळीच उपचार घेतले तर कोरोना बरा होतो. कोरोनाचे निदान करण्यासाठी अँटीजेन सारख्या मोफत चाचण्या महापालिकेकडून सर्वत्र होत आहेत. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. त्याचबरोबर उपचारासाठी येणाऱ्या तापाच्या रुग्णांना कोरोना चाचणी करण्यासंदर्भात सूचना फॅमिली डॉक्टरांनी कराव्यात, असं आवाहन केडीएमसीच्या साथरोग प्रतिबंधक प्रमुख डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.