मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात कोरोनाबाबत कुठं चुकतेय रणनीती? शरद पवारांनी लावला बैठकांचा सपाटा

पुण्यात कोरोनाबाबत कुठं चुकतेय रणनीती? शरद पवारांनी लावला बैठकांचा सपाटा

कोरोनाबाधित रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये चिंता वाढली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये चिंता वाढली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये चिंता वाढली आहे.

पुणे, 5 सप्टेंबर: पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा मोठा संसर्ग आहे. कोरोनाबाधित रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये चिंता वाढली आहे. त्यात पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी आणि सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: मैदानात उतरले आहेत.

हेही वाचा...आता 'जनता कर्फ्यू' कशाला? बारामतीकरांच्या विरोधामुळे अजित पवारांना धक्का

शरद पवार आज शनिवारी तिसऱ्या दिवशी पुण्यात आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आाढावा घेत आहेत. कोरोनाबाबत रणनीती कुठं चुकतेय? काय केलं पाहिजे? यावर शरद पवार प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. आजही शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी, डॉक्टरांच्या महत्त्वपूर्ण बैठका बोलवल्या आहेत. सकाळी 11 नंतर एकूण 4 बैठका होणार आहे. त्याचबरोबर शरद पवार आणि प्रकाश जावडेकर वृत्तपत्रांच्या संपादकांसोबतही चर्चा करणार आहेत. नंतर 4.30 वाजता प्रकाश जावडेकर हे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.

दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाबत स्थिती का बिघडत आहे, कुठे काय चुकत आहे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली. जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी, प्रशासकीय गलथानपणा याबाबतही शरद पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची शाळा घेत त्यांची चांगलीच कान उघाडणी केली.

शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी..

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता तब्बल 800 बेडची जम्बो कोविड रुग्णालये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गाजावाजा करत सुरू करण्यात आली होती. प्रत्यक्षात संबंधित ठिकाणी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय साधने, औषधे यांची कमतरतेसोबतच समन्वय नसल्याने अनेक रुग्ण दगावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. परिणामी नागरिकांची संबंधित कोविड सेंटरवरील विश्वासार्हता ढासळू लागली आहे. शरद पवार यांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत, विभागीय आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांना समज देत लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना केल्या आहेत.

हेही वाचा...कंगनाला उपरती! म्हणाली, मुंबईनं मला यशोदामाईसारखं सांभाळलं...

राज्य सरकार मदत करत असताना ही परिस्थिती बिघडत का आहे, कुणाचे नियंत्रण सर्व घडामोडींवर आहे, बिघडलेल्या परिस्थितीला नेमकं कोण जबाबदार आहे, नेमक्या कोणत्या चुका होत आहेत, कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे आदी बाबींचा विचार झाला पाहिजे, असंही पवारांनी सांगितले आहे.

First published:

Tags: Sharad pawar