मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुंबई हादरली, 20 वर्षीय मुलाने वडिलांची आणि आजोबांची हत्या करून मारली इमारतीवरून उडी!

मुंबई हादरली, 20 वर्षीय मुलाने वडिलांची आणि आजोबांची हत्या करून मारली इमारतीवरून उडी!

या घटनेमुळे सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. 20 वर्षीय शार्दुल असं काही करेल यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता.

या घटनेमुळे सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. 20 वर्षीय शार्दुल असं काही करेल यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता.

या घटनेमुळे सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. 20 वर्षीय शार्दुल असं काही करेल यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता.

मनोज कुळकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 06 मार्च : मुंबईतील (Mumbai) मुलुंड परिसरात (Mulund) एका तरुणाने आपल्या जन्मदात्या बापाची आणि आजोबांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील आणि आजोबांची हत्या केल्यानंतर या तरुणानेही इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मुलुंड पश्चिम एलबीएस रोडवरील वसंत कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे.  शार्दुल मांगले असे या 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याचे आजोबा सुरेश मांगले (84) आणि वडील मिलिंद मांगले यांचे मृतदेह घरी आढळून आले आहेत.

शार्दुलने आपल्या वडिलांनी हत्या केली आणि त्यानंतर आजोबांची हत्या केली. आपल्या जन्मदात्या बापाची हत्या आपल्या हातून झाल्यानंतर हादरलेल्या शार्दुलने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. शार्दुलने राहत असलेल्या इमारतीच्या छतावरून उडी मारुन आपला जीव दिला.

1 एप्रिलपासून कारममध्ये हे फीचर नसल्यास येईल समस्या, जाणून घ्या सरकारचा नवा नियम

या घटनेमुळे सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. 20 वर्षीय शार्दुल असं काही करेल यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. सोसायटीतील रहिवाशांनी तातडीने मुलुंड पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह ताब्यात घेतली. घरात वडील आणि आजोबांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

शिर्डीत भाविकांकडून होणार टोलवसुली, नगरपंचायतीच्या निर्णयामुळे पेटला वाद

शार्दुलने आपल्या वडिलांनी आणि आजोबांची हत्या का केली, हत्या केल्यानंतर आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime, Mumbai, Murder, Shocking news, Suicide