अहमदनगर, 04 एप्रिल : अहमदनगर (Ahmednagar ) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या सात दिवसाचा विचार केला तर तब्बल 10450 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 46 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विस्फोट झाला आहे. एवढंच नाहीतर दिवसेंदिवस संकट वाढत असून उपचारासाठी बेड मिळेनासे झाले आहे.
'अजून रंग उतरला नाही...', म्हणत बिग बींनी Virushka वर केला मजेदार विनोद
त्याचबरोबर, कोरोनावर उपचारासाठी वापरले जाणारे रेमेडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा सुद्धा जाणवू लागला आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू असूनही प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.
'मतदान केंद्रावर कोणतीही हिंसा नाही'; ममता बॅनर्जींचे आरोप EC नं फेटाळले
लस उबलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी लोकांना कोरोनाची लसही मिळत नाही तर जिल्हा रूग्णालयातून स्वॅबचा रिपोर्ट मिळायला सहा दिवस लागत आहेत. अशा कारणाने जिल्ह्यातील रूग्णसंख्या आणखी वाढताना दिसत आहे.
अहमदनगर जिल्हा
28 मार्च 1228 _ 00 मृत्यू
29 मार्च 1347 _ 03 मृत्यू
30 मार्च 1100 _ 10 मृत्यू
31 मार्च 1680 _ 13 मृत्यू
01एप्रिल 1319 _04 मृत्यू
02 एप्रिल 1800 _ 11 मृत्यू
03 एप्रिल 1996 _ 05 मृत्यू
तर मागील सात दिवसांत 10470 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या सात दिवसांत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. सरासरी 1500 रुग्णांची भर पडली आहे.
शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यानं प्रेयसीची हत्या; इमारतीवरून पडल्याचा रचला बनाव
शहरात आजपर्यंत एकूण रूग्ण संख्या ही 1 लाख पार झाली आहे. तर 9098 वर उपचार सुरू आहे. बरे होण्याचे प्रमाण 89.67% टक्के आहे. बरे झालेले रूग्ण संख्या 89 हजार 701 इतकी आहे. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कोरोनामुळे 1238 जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: अहमदनगर