कोलकाता 04 एप्रिल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान (West Bengal Assembly Election 2021) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Benerjee) यांनी केलेल्या तक्रारीवर निवडणूक आयोगानं (Election Commission) उत्तर दिलं आहे. निवडणूक आयोगानं हे स्पष्ट शब्दात म्हटलं, की नंदीग्राम बूथ नंबर 7 वर शांतीपूर्ण मतदान झालं आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारची हिंसा झालेली नाही.
निवडणूक आयोगानं (Election Commission) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं, तुम्ही पत्रात लिहिलेल्या गोष्टींमध्ये तथ्य नाही. एक एप्रिलला नंदीग्राममध्ये झालेल्या मतदानात काहीही अडचणी आल्या नव्हत्या. बीएसएफ जवानांवर लावण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. हिंसा आणि मतदारांना घाबरवल्याचं तुम्ही सांगितलं, हेदेखील खोटं आहे. नंदीग्रामच्या बूथ नंबर 7 वर झालेलं मतदान अतिशय शांतीपूर्ण आणि योग्य पद्धतीनं झालं आहे.
सुरक्षा दलावर केले होते आरोप -
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) दुसऱ्या टप्प्यातील मतदान मागील गुरुवारी पार पडलं. यानंतर ममता बॅनर्जी यांनी असा आरोप केला होता, की केंद्रीय सुरक्षा दलानं केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम केलं आहे. ममता यांनी म्हटलं होतं, की त्यांनी निवडणूक आयोगाकडे 63 तक्रारी करुनही आयोगानं याकडे गंभीरतेनं लक्ष दिलं नाही.
ममता यांनी आरोप केला होता, की गृहमंत्री स्वतः सीआरपीएफ, बीएसएफ आणि इतर जवानांना निर्देश देत आहेत, की फक्त भाजप आणि त्यांच्या लोकांचीच मदत करावी. मात्र, तरीही निवडणूक आयोग शांत आहे, याबद्दल मी निंदा व्यक्त करते. आम्ही अनेक पत्र लिहूनही ते भाजप उमेदवारांचं समर्थन करत आहेत. ममता यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, की नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात बूथ नंबर 7 गडबड झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, Election commission, Mamata banerjee, West Bengal Election