• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • Nagpur Crime: शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यानं प्रेयसीची हत्या; इमारतीवरून पडल्याचा रचला बनाव

Nagpur Crime: शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यानं प्रेयसीची हत्या; इमारतीवरून पडल्याचा रचला बनाव

Crime in Nagpur: किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर प्रियसीनं शारीरिक संबंध ठेवायला नकार (Lover refused to have sexual relation) दिल्यानं प्रियकराने तिची हत्या (Murder) केली आहे.

  • Share this:
    नागपूर, 04 एप्रिल: किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर प्रेयसीनं शारीरिक संबंध ठेवायला नकार दिल्यानं प्रियकराने तिची हत्या (Nagpur Murder) केल्याची घटना नागपुरात घडली आहे. या हत्येच्या घटनेनंतर आरोपीनं पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी संबंधित महिला इमारतीवरून पडली असल्याचा बनाव रचला आहे. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. त्याच्या बोलण्यात विसंगती आढळल्यानंतर पोलिसांनी या हत्येचं रहस्य उलगडलं असून आरोपी प्रियकराला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. संबंधित आरोपीचं नाव मोहम्मद जाविद मोहम्मद युसूफ शेख (वय-38) असं असून तो मध्यप्रदेशातील बैतूल येथील रहिवासी आहे. तर 33 वर्षीय मृत प्रेयसीचं नाव सारिका शंकर पटेल असून ती सुदामनगरी अंबाझरी येथील रहिवासी आहे. आरोपीचं आणि मृत सारिका गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांचही लग्न झालं असून सारिका गेल्या तीन- चार वर्षांपासून आपल्या नवऱ्यापासून वेगळी राहत होती. तर आरोपी जाविदही आपल्या पत्नीला सोडून कामानिमित्त नागपूरात राहत होता. दरम्यान दोघांची ओळख होऊन गेल्या काही काळापासून दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तर आरोपी जाविद हा एका बांधकामाच्या ठिकाणी चौकीदार म्हणून काम करत होता. (हे वाचा-बलात्कार प्रकरणातील दोषी इसम होता फरार; 25 वर्षांनंतर आवळल्या मुसक्या) दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, 31 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास जेवन झाल्यानंतर दोघांत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर मृत सारिका तेथून रागाने इतर कामगारांसोबत गप्पा मारायला निघून गेली. त्यामुळे संतापलेल्या जाविदने महिल्या मजल्यावरून तिला विट फेकून मारली. यामुळे ती जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपी जाविदने आरडाओरडा करत इतर कामागारांना मदतीसाठी बोलावलं आणि सारिका इमारतीवरून पडली असल्याचा बनाव रचला. (हे वाचा-पत्नीसोबत झालेल्या वादाचा बदला म्हणून मेव्हुण्याच्या गर्भवती पत्नीवर बलात्कार) घटना सीसीटीव्हीत कैद या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट येऊन पाहणी केली असता, अनेक गोष्टी संशयास्पद आढळल्या. तसेच आरोपी जाविदच्या बोलण्यामध्येही विसंगती आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेतला असता, आरोपी जाविद इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून विट फेकून मारताना निदर्शनास आला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी जाविदला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published: