मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'अजून रंग उतरला नाही...', म्हणत बिग बी यांनी Virushka वर केला मजेदार विनोद

'अजून रंग उतरला नाही...', म्हणत बिग बी यांनी Virushka वर केला मजेदार विनोद

बिग बींनी (Amitabh Bachchan) अलीकडेच देशातलं स्टार कपल विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मावर (Anushka Sharma) एक विनोद तयार (Made Joke) केला आहे. त्यांचा हा विनोद सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे.

मुंबई, 04 एप्रिल: बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर खूपच सक्रीय असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी काहींना काही टाकत असतात. अनेकदा ते स्वतःचे सुविचार किंवा विनोदही शेअर करत असतात.  बिग बींनी अलीकडेच देशातलं स्टार कपल विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मावर (Anushka Sharma) एक विनोद तयार केला आहे. त्यांचा हा विनोद सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे.

यावेळी अमिताभ बच्चननी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा कलरफुल शर्ट परिधान केलेला फोटो अपलोड केला आहे. या फोटोमधील त्यांच्या अंगावरील कपडे होळीच्या विविध रंगानी माखलेले आहेत. त्यांनी हा कलरफुल फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला आहे. तसेच विराट आणि अनुष्कावर मजेदार विनोदही केला आहे. त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'अजूनही रंग उतरला नाही आणि सणांचे चुटकुले बंद नाही झाले. विराट आणि अनुष्काचा सन्मान करत एक जोक.... ENGLISH : Anushka has a huge apartment ! हिंदी: अनुष्का के पास विराट खोली है!'

यावेळी अमिताभ बच्चन यांनी काही योग्य शब्दांचा वापर करत ही विनोद निर्मिती केली आहे. त्यांनी 'Anushka has a huge apartment' या इंग्रजी वाक्याचं हिंदीत भाषांतर केलं आहे. 'अनुष्का के पास विराट खोली है' या वाक्यातून त्यांना अनुष्काजवळ विराट कोहली आहे, असं सांगायचं आहे. त्यांचा हा विनोद सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं असून अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. मात्र अनुष्का किंवा विराटकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

(हे वाचा - ‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ)

अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच कोरोनाची लस घेतली आहे. याची माहितीही त्यांनी सोशल मीडियावर दिली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, लस घेतल्यानंतर त्यांची प्रकृती ठिक आहे. लस टोचल्यानंतर त्यांना कोणतीही समस्या जाणवली नाही. त्यांच्या कुटुंबात अभिषेक बच्चन यांनी अद्याप लस घेतली नाही, परंतु पुढच्या काही दिवसांतच तोही लस घेईल, अशी माहितीही त्यांनी संबंधित पोस्टमध्ये दिली होती.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Virat anushka