मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

Good News : जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात भरला आशियातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प

Good News : जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात भरला आशियातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प

Nanded Vishnupuri Irrigation Project - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं सुरु असलेल्या पावसामुळं प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. विष्णूपुरी प्रकल्प सध्या ८८ टक्के भरलेला आहे.

  • Published by:  News18 Desk

नांदेड, 11 जून : आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प (Vishnupuri Irrigation Project) म्हणून ओळख असलेला विष्णूपुरी प्रकल्प, पहिल्याच पावसात तुडूंब भरला आहे. जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात हा प्रकल्प भरल्यानं आनंदाचं वातावरण आहे. या प्रकल्पाच्या पाण्यावर नांदेड शहराची तहान भागते. तसंच दक्षिण नांदेड भागातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सोडवणारा हा प्रकल्प जूनमध्येच भरल्यानं प्रकल्पाचे दरवाजे कोणत्या क्षणी उघडण्याचा इशारा पूर नियंत्रण विभागाकडून देण्यात आला आहे. जूनमध्येच विष्णुपुरी प्रकल्प भरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

(वाचा-घरगुती उपचाराने घेतला चिमुरड्याचा जीव, करंट लागला म्हणून वाळूखाली पुरुन ठेवलं)

यंदा राज्यात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूननं आगमन अंदाजाप्रमाणे किंबहुना आधीच झाल्यानं पावसाला सुरुवातही झाली आहे. त्याआधीच्या मान्सूनपूर्व सरींचाही फायदा पाणी पातळीच्या वाढीसाठीही होत आहे. नांदेडमधील गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पातही त्याचा फायदा पाहायला मिळतोय. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून चांगला पाऊस सुरु आहे. परभणी जिल्ह्यात पाऊस होत असल्यानं पूर्णा नदीचं पाणी विष्णुपुरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे.

(वाचा-महाराष्ट्राने कोरोनाचे मृत्यू लपवले? आरोग्य विभागाने दिलं 'हे' स्पष्टीकरण)

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं सुरु असलेल्या पावसामुळं प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. विष्णूपुरी प्रकल्प सध्या ८८ टक्के भरलेला आहे. पण प्रकल्पात पाण्याची आवक सुरु असल्यानं प्रकल्पाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्यात येणार आहेत. त्यामुळं प्रकल्पाच्या खालील बाजूस असणाऱ्या गावातील नागरिकांना इशारा देण्यात आलेला आहे. पशुधनाची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे नांदेड शहराची तहान भागविली जाते. हा प्रकल्प कधी भरणार याकडे नांदेडकरांचे लक्ष असते. मात्र हा प्रकल्प पहिल्यांदाच जून मध्ये भरल्याने नांदेडकरांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलं आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यानं जुलै महिन्यात प्रकल्प भरला होता. दहा जुलै रोजी प्रकल्पाचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आलं होतं. यंदा एक जून रोजी प्रकल्पात 42 पाणीसाठा होता. 10 जून रोजी तो 88 टक्क्यांवर पोहोचला आहे. प्रकल्पात पाण्याची आवक सुरुच असल्यानं प्रकल्पाचा दरवाजा कधाही उघडला जाऊ शकतो, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Monsoon, Nanded, Rain