मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सोबत चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे, काँग्रेस नेत्याची थेट मागणी

सोबत चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे, काँग्रेस नेत्याची थेट मागणी

सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्ष  जेव्हा एकत्र आले होते, तेव्हाच उपमुख्यमंत्रिपद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्याचं ठरलं होतं.

सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्ष जेव्हा एकत्र आले होते, तेव्हाच उपमुख्यमंत्रिपद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्याचं ठरलं होतं.

सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्ष जेव्हा एकत्र आले होते, तेव्हाच उपमुख्यमंत्रिपद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्याचं ठरलं होतं.

यवतमाळ, 05 फेब्रुवारी : 'राज्यात शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP), काँग्रेसचे (Congress) समान सरकार आहे. त्यामुळे सभापतीपद हे काँग्रेसकडेच आहे. त्यामध्ये दोन्ही पक्ष सहकार्य करत आहे. सर्वांना घेऊन चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे' अशी मागणीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे (Manikrao Thackery) यांनी केली आहे.

काँग्रेसच्या प्रदेशध्यक्षापदी नाना पटोले यांची निवड निश्चित झाली आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा दिला आहे. पण प्रदेशाध्यपदाच्या निवडीबरोबरच उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा सुद्धा रंगली आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. तर दुसरीकडे माणिकराव ठाकरे यांनी थेट मागणी करून दणका दिला आहे.

आणखी एक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, 'स्वाभिमानी'ची साथ सोडणार?

'महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्ष जेव्हा एकत्र आले होते, तेव्हाच उपमुख्यमंत्रिपद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्याचं ठरलं होतं. मात्र शेवटी उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला आणि सभापतीपद काँग्रेसला देण्यात आले होते', असा खुलासा माणिकराव ठाकरे यांनी केला.

समसमान कार्यक्रमावर सरकार आहे आणि सर्वांना घेऊन चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे, असं मतही माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

बिबट्यासोबत 7 तास अडकला होता कुत्रा, पुढे जे काही झालं ते पाहून आश्चर्य वाटेल

तसंच, राज्यपाल भगतसिंग कोशारी हे कुठल्या पक्षाचे अध्यक्ष असल्यासारखे वागत आहेत, भाजपचे राजकारण राजभवनावरून चालत आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडून भगतसिंग कोशारी यांना द्यावे, असा टोलाही माणिकराव ठाकरे यांनी लगावला.

काँग्रेसमध्ये नवे बदल

विधानसभेचे अध्यक्ष असलेले नाना पटोले (Nana patole) यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. त्यापाठोपाठ आता सहा कार्यकारी अध्यक्ष सुद्धा नेमण्याची हालचाल सुरू झाली आहे. पक्षासाठी पूर्णवेळ देणाऱ्या नेत्यांना कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले जाणार आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांना याची जबाबदारी दिली जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत दोन कार्यकारी अध्यक्ष देण्याची शक्यता आहे. यामध्ये माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्याचा विचार सुरू आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामधून मंत्रिपदासाठी वर्णी लागावी यासाठी इच्छुक असलेल्या पण संधी गमावलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. उत्तर महाराष्ट्रात माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे चिरंजीव आमदार कुणाल पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांचे नाव मधून नाव चर्चेत आहेत.

राज्यपालांनी आता अंत पाहू नये, अजित पवारांनी दिला इशारा

धुळे जळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष संघटनांमध्ये ताकद दिली तर त्याचा फायदा पक्षाला होईल, असे मत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटते.विदर्भामध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे तसंच माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातून येथून बसवराज पाटील यांची कार्यकारी अध्यक्ष काँग्रेस देण्याची शक्यता असल्याचे समजत आहे.

First published: