मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आणखी एक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, 'स्वाभिमानी'ची साथ सोडणार?

आणखी एक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, 'स्वाभिमानी'ची साथ सोडणार?

काही महिन्यांपूर्वी पक्षश्रेष्ठींमुळे मंत्रिपद न मिळाल्याची खंत देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली होती.

काही महिन्यांपूर्वी पक्षश्रेष्ठींमुळे मंत्रिपद न मिळाल्याची खंत देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली होती.

काही महिन्यांपूर्वी पक्षश्रेष्ठींमुळे मंत्रिपद न मिळाल्याची खंत देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली होती.

अमरावती, 05 फेब्रुवारी : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये दाखल झाल्यानंतर जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे. भाजपमधील अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. तर दुसरीकडे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा वतीने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आयोजित करण्यात आला होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख हे हजर होते. हा परिवार संवाद कार्यक्रम केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आला होता.  मात्र, या कार्यक्रमातून पत्रकारांना व इतर कार्यकर्त्यांना बसण्यास मनाई करण्यात आली होती.

परंतु, कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी पूर्णवेळ हजेरी लावली होती. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चेना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी  पक्षश्रेष्ठींमुळे मंत्रिपद न मिळाल्याची खंत देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली होती. तसंच माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर देवेंद्र भुयार यांची नाराजी असल्याची ही जोरदार चर्चा आहे.

मध्यंतरीच्या काळात खुद्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीमध्ये जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यातील वाद हा राज्याला सर्वश्रूत आहे. या भेटीमुळे दोन्ही नेत्यांमधील वाद निव्वळ होता.

First published: