मराठी बातम्या /बातम्या /पुणे /राज्यपालांनी आता अंत पाहू नये, अजित पवारांनी दिला इशारा

राज्यपालांनी आता अंत पाहू नये, अजित पवारांनी दिला इशारा

'विधान परिषदेच्या आमदारांच्या निवडीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्यापपर्यंत निर्णय घेतलेला नाही'

'विधान परिषदेच्या आमदारांच्या निवडीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्यापपर्यंत निर्णय घेतलेला नाही'

'विधान परिषदेच्या आमदारांच्या निवडीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्यापपर्यंत निर्णय घेतलेला नाही'

पुणे, 05 फेब्रुवारी : राज्यपाल (governor) नियुक्त आमदाराचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. पण त्याच्यावर अजूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh) यांनी  निर्णय न घेण्यात आल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांनी आता अंत पाहू नये, असा इशाराच अजित पवारांनी दिला आहे.

पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते भूजल मापन केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि दोन उपमुख्यमंत्री नेमण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली.

'विधान परिषदेच्या आमदारांच्या निवडीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्यापपर्यंत निर्णय घेतलेला नाही. त्यावर अजित पवार म्हणाले की, 'राज्यपालांनी आता अंत पाहू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीनिशी प्रस्ताव दिलेला आहे. याबाबत आता राज्यपालांची वेळ घेऊन चर्चा करणार आहोत. तसंच आमचं 171 आमदारांचे बहुमत सिद्ध झालेले आहे.' अशी आठवणच अजितदादांनी राज्यपालांना करून दिली.

आणखी एका उपमुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, 'आणखी एक उपमुख्यमंत्रिपद असे काही ठरलेले नाही. मी कालच हे सांगितलं, आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?' राज्यात दोन उपमुख्यमंत्रिपद असण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना समसमान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे  फॉर्मुला आधीच ठरलेला आहे, त्यात कोणताही बदल नाही, असं पुन्हा एकदा अजित पवार यांनी स्पष्ट केले.

3 महिने सेलिब्रिटी झोपले होते का?

शेतकरी आंदोलनाविरोधात ट्वीट करणारे सेलिब्रिटी हे गेले तीन महिने  झोपले होते का? असा थेट सवाल अजित पवारांनी विचारला. तसंच, 'केंद्र सरकारने आता तरी या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. या सरकारला केवळ आपला आणि आपलं म्हणणं रेटून यायचे असे दिसते. मात्र, लाखांचा पोशिंदा असलेला शेतकरी हे मान्य करणार नाही, त्यामुळे सरकारला सामंजस्याची भूमिका घ्यावी', असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

ज्यावेळी कंत्राटदाराला जी त्यांनी इमारत बांधताना घ्यावयाच्या काळजी घेण्याच्या सुचना दिल्या त्याने कंत्राटदाराला घाम फुटला होता. आपण येता-जात या रस्त्याने कधीही इमारतीच्या कामाची पाहणी करायला येऊ, असा दमही त्यांनी कंत्राटदाराला भरला आहे त्यामुळे ही इमारत बांधत असताना ती पुण्यात होतेय हे लक्षात असू द्या अशी तंबीही त्यांनी कंत्राटदाराला दिली.

'फडणवीसांनी केंद्राला सांगावे'

देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला कर कमी केले तर पेट्रोलच्या दरात कपात करता येईल, असा सल्ला दिला होता, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, अजित पवार म्हणाले की, त्यांना सांगा आधी केंद्रातले कर कमी करा मग राज्य सरकार विचार करेल' असा टोलाही पवारांनी लगावला.

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर नाराज नाही

नाना पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर कुणीही नाराज नाही. त्यांनी जर अधिवेशन झाल्यानंतर राजीनामा दिला असता तर अधिक बरे झाले असते. त्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.

धनंजय मुंडे प्रकरण ते म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात पोलिसांनी काल धनंजय मुंडे यांच्या मुलांचे जबाब घेतलेला आहे. यात कोणीही राजकीय हस्तक्षेप करणार नाही. पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणावर काहीही बोलता येणार नाही.

First published: