शिवाजी महाराजांचा पुतळा काँग्रेस आमदारानं हटवला, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

शिवाजी महाराजांचा पुतळा काँग्रेस आमदारानं हटवला, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

भाजपचे नेते नितेश राणे यांनी आगीत आणखी तेल ओतण्याचं काम केलं.....

  • Share this:

मुंबई, 9 ऑगस्ट: बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याप्रकरणी शिवभक्तांनी तिव्र संताप व्यक्त केला असताना भाजपचे नेते नितेश राणे यांनी आगीत आणखी तेल ओतण्याचं काम केलं आहे.

बेळगावात शिवरायांचा पुतळा काँगेस आमदार सतीश जारकीहोळी यांनी हटवला आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केली आहे. आता नितेश राणे यांनी केलेल्या आरोपावर काँग्रेस काय स्पष्टीकरण देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा...शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारनं रातोरात हटवला, शिवभक्तांमध्ये संतापाची लाट

दुसरीकडे, शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून एक दिवस उलटला तरी अजूनही कोणतीही कारवाई झाली. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

'कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि भाजपच्या राज्यात शिवरायांचा अवमान होतो, हे खपवून न घेण्यासारखे आहे. भाजपने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. तसेच, कर्नाटक सरकारने शिवाजी महाराजांचा पूर्ण सन्मानाने शिवरायांचा पुतळा पुन्हा तिथे लावण्यात यावा. यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घ्यायला हवी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे तिथे जायला तयार आहोत' असा सल्लावजा टोलाही राऊत यांनी फडणवीसांना लगावला.

काय आहे प्रकरण...

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाब आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाब कमी झाला होता. मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या परवानगीनं शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्यात आला आहे. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं शनिवारी हटवला.

हेही वाचा...पंढरपूर पोलिस दलात कोरोनाचा पहिला बळी, मुलीचं लग्न न बघताच पोलिस वडिलांचा मृत्यू

सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 9, 2020, 2:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading