Home /News /maharashtra /

पंढरपूर पोलिस दलात कोरोनाचा पहिला बळी, मुलीचं लग्न न बघताच पोलिस वडिलांचा मृत्यू

पंढरपूर पोलिस दलात कोरोनाचा पहिला बळी, मुलीचं लग्न न बघताच पोलिस वडिलांचा मृत्यू

मुलाणी मुलीचं नुकतंच लग्न ठरलं होतं आणि काही दिवसांनीच तिचा विवाह होणार होता. परंतु

पंढरपूर, 9 ऑगस्ट: राज्यभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या आजारामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहेत. त्यात पंढरपूर शहरातून एक दु:खद बातमी समोर आला आहे. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे नाईक आमिन आप्पा मुलाणी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोनामुळे पोलिस दलातील अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची पंढरपूरतील ही पहिलीच घटना आहे. हेही वाचा...साऱ्या जगाला आशा देणारी ऑक्सफर्डची कोरोना लस शास्त्रज्ञांमुळेच अडचणीत पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक अमिन आप्पा मुलाणी (वय 50, रा. पोलीस लाईन, पंढरपूर) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आमिन मुलाणी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरू होते. या दरम्यान रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मुलाणी यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले व 1 मुलगी असा परिवार आहे. मुलाणी मुलीचं नुकतंच लग्न ठरलं होतं आणि काही दिवसांनीच तिचा विवाह होणार होता. परंतु काळाने अचानक मुलाणी यांच्यावर झडप घातली. कुटुंबातील ते एकमेव आधार होते. एकलुती एक लेकीचा विवाह सोहळा न बघताच पोलिस वडिलांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाणी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एकूण 4 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी दोघेजण कोरोनामुक्त झाले असून एकाचे असे दुःखद निधन झाले आहे तर एकावर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती मिळाली आहे. हेही वाचा...तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या आकडेवारीनं मोडला रेकॉर्ड, 24 तासातील धक्कादायक आकडेवारी पंढरपूर शहरातील पोलीसाचा कोरोनामुळे पहिला बळी गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून कायदेशीर मदत मिळणे अपेक्षित आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Pandharpur, Solapur news

पुढील बातम्या