अयोध्या 07 मार्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्येत जाणार आहेत. महाविकास आघाडीला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाकरे हे सहकुटूंब रामलल्लाचं दर्शन घेणार आहे. दोन महिन्यांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी या दौऱ्याची घोषणा केली होती. या आधीही दोन वेळा ठाकरे हे अयोध्येत गेले होतो. लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी अयोध्येत जाऊन दर्शन घेतलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर परिस्थिती बदलली आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केलं. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय. आधीच्या दौन दौऱ्यांमध्ये त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार आणि खासदार होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्या दौऱ्यावर टीकाही केली होती. आता मात्र हे दोनही पक्ष शिवसेनेचे मित्र झाले आहेत. त्यामुळे त्यांनी या दौऱ्यावर टीका केलेली नाही. उलट काँग्रेसचे एक दिग्गज नेते आणि मंत्री या दौऱ्यात सहभागी झालेत. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हेही या दौऱ्यात सहभागी असून ते अयोध्येत दाखलही झाले आहेत. राम हा सगळ्यांचा असून भारताच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक एकतेचं प्रतिक आहे. त्यामुळे अयोध्येत येवून प्रभूरामाचं दर्शन घेण्यात काहीही वावगं नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसने आपली धर्मनिरपेक्ष अशी प्रतिमा जपण्यासाठी कायम राम मंदिराच्या प्रश्नावर वेगळी भूमिका घेतली होती. त्यामुळे केदार यांच्या अयोध्या दौऱ्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. ‘मुख्यमंत्रिपद हे उद्धव ठाकरेंचं काम नाही’, चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांचा हा तिसरा अयोध्या दौरा आहे.या आधी जेव्हा उद्धव ठाकरे अयोध्येत, श्री राम जन्मभूमीच्या दर्शानाला आले होते. तेव्हा त्यांच्या दौर्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती. आज होणाऱ्या शिवसेनेच्या दौऱ्यावर मात्र, कोरोना व्हायरसचं सावट स्पष्टपणे दिसून येतंय. कारण, शिवसेनेची नियोजित शरयु नदी महाआरती रद्द करण्यात आली आहे. कारण, कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि आरोग्य विभागांनी लोकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्यामुळे शरयू महाआरतीसाठी हजारोंच्या संख्येनं होणारी गर्दी आणि कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेची शरयू महाआरतीला परवानगी देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर, शरयूची आरती रद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाल्यावर त्यांची पत्रकार परीषद होणार आहे. त्यानंतर ते राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखिल उपस्थित असणार आहेत.
रिक्षा चालवून संसार उभारला, काही क्षणात आगीने केली राखरांगोळी!
शिवसेनेच्या या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाचे नेते, मंत्री, खासदार, आमदार देखील उपस्थित राहणार आहेत. मुंबई आणि ठाण्याहून हजारोंच्चा संख्येने शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेत. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमुळे शिवसेनेनं त्यांचं आक्रमक हिंदु्त्त्व मवाळ केल्याचेही आरोप विरोधकांडून केले जात होते. या सर्व आरोपांना शिवसेना आज कृतीतून उत्तर देणार असल्याचं सांगितलं जातंय.

)







