रिक्षा चालवून संसार उभारला, काही क्षणात आगीने केली राखरांगोळी!

रिक्षा चालवून संसार उभारला, काही क्षणात आगीने केली राखरांगोळी!

हात मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या जैन कुटुंबाच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

  • Share this:

इम्तियाज अली, प्रतिनिधी

फैजपूर, 06 मार्च :  जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर शहरातील रथगल्ली भागात हात मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या जैन कुटुंबाच्या घराला  शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत जैन कुटुंबाचा संपूर्ण संसार भस्मसात झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यावल तालुक्यातील फैजपूर शहरातील रथगल्ली मधील रिक्षाचालक किरण लीलाधर जैन तसंच त्यांचे नातेवाईक सुपडू जैन, पुष्पाबाई जैन आणि याकुबखान अलियारखान यांच्या जुन्या घराला  शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती.  या आगीने थोड्याच वेळात रौद्ररूप धारण केले.

आगीची माहिती देण्यासाठी अग्निशमन केंद्र पालिका कार्यालय या ठिकाणी अनेकांनी फोन लावले. पण त्याला प्रतिसाद न मिळाल्याने काहींनी हाकेच्या अंतरावर असलेले अग्निशमन केंद्र गाठले. परंतु, त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. तोपर्यंत आगीने भीषण रूप धारण केले होते.

तब्बल पाऊन तासानंतर अग्निशमन बंब दाखल झाला तोही अपूर्ण भरलेल्या स्थितीत. त्यामुळे नागरिकांनी चांगला संताप व्यक्त केला. पालिकेच्या 2 आणि सावदा पालिकेच्या अग्निशमन बंब यांनी तब्बल दोन ते तीन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविलं. या आगीत किरण जैन आणि त्यांचे नातेवाईक यांचे संसारोपयोगी वस्तू तसंच विक्रीसाठी असलेले आणि होळीच्या यात्रेनिमित्त विक्रीसाठी आणलेले कपडे सामान आणि रोख रक्कम, टीव्ही,फ्रिज,शासकीय कागदपत्रे,धान्य,रोज वापरासाठी लागणारे कपडे संपूर्ण जळून खाक झाले. आधीच हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यात आगीमुळे जैन कुटुंबावर मोठे आभाळ कोसळले आहे.

गाडीच्या  वादा वरून मुलाने केली बापाची हत्या

दरम्यान, एका दुचाकीसाठी मुलाने आपल्याच जन्मदात्या बापाला काठीने बेदम मारहाण करून जीव घेतल्याची संतापजनक घटना भंडारा भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात घडली.  वडिलांचा खून करून मुलगा थेट पोलीस ठाण्यात पोहचला एकच खळबळ उडाली होती.

ताराचंद टिचकुले वय 52 वर्ष असं मृत वडिलांचे नाव आहे. ताराचंद आणि त्यांचा मुलगा लोकेश ताराचंद टिचकुले (वय 21) यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होता. गुरुवारी दुपारी लोकेश टिचकुले शेतातून घरी परत आले. येताच त्याने वडील ताराचंद यांना 'माझ्या दुचाकीची चाबी दे', असं म्हटलं.  मुलांचा अवतार पाहून वडिलांनी नकार देताच त्याने भांडण सुरू केले. आपलाच मुलगा आपल्याशी भांडत असल्यामुळे ताराचंद यांचा पार चढला आणि त्यांनी अंगणात पडलेल्या काठीने लोकेशला अंगणात मारहाण केली.

त्यामुळे संतप्त झालेल्या लोकेशने त्यांच्या हातातून काठी घेऊन ताराचंद यांच्या डोक्यावर प्रहार केले.  क्षणात ताराचंद हे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ताराचंद हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना दोन मुलं असून लोकेश हा लहान मुलगा आहे. नेहमी तो वडिलांसोबत वाद घालत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं.

या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.  रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या ताराचंदला पाहून प्रत्येक जण हळहळत व्यक्त  करत होता. तर हत्या केल्यानंतर आरोपी लोकेशने स्वत: लाखनी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर हजर झाला. आणि आपण वडिलांचा खून केला असल्याची कबुली दिला. पोलिसांनी तातडीने लोकेशला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. परंतु, अत्यंत किरकोळ कारणावरून मुलानेच बापाची हत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

First published: March 6, 2020, 11:44 PM IST

ताज्या बातम्या