बाप्पाच्या भाविकांना आता घरबसल्या घेता येणार मुंबईच्या सिद्धीविनायकाचं दर्शन

बाप्पाच्या भाविकांना आता घरबसल्या घेता येणार मुंबईच्या सिद्धीविनायकाचं दर्शन

'सिद्धीविनायक टेंपल' या मोबाईल ॲपचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट:असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मुंबईतील प्रभादेवी परिसरात असणाऱ्या सिद्धीविनायक गणपतीचं आता भाविकांना घरबसल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. 'सिद्धीविनायक टेंपल' या मोबाईल ॲपचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

हेही वाचा...सच्चा कोरोना योद्धा! डॉक्टरनंच अ‍ॅम्ब्युलन्स चालवून वाचवले कोरोना रुग्णाचे प्राण

कोरोना काळात मंदिरे बंद असल्याने भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येत नव्हते. भाविकांच्या सोईसाठी न्यासातर्फे ही विशेष सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘सिद्धीविनायक टेंपल’ या नावाने असणारे हे ॲप अँड्राईड आणि ॲपलवरुन डाऊनलोड करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून भाविकांना ऑनलाईन दर्शनाची वेळ बुक करता येणार आहे. या बुक केलेल्या वेळी भाविकांच्या नावे मंदिराचे पुजारी थेट गाभाऱ्यातून आशिर्वचन करतील. तसेच ॲपद्वारे भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार असून मंदिरातील विविध सण- उत्सवांची अद्यायावत माहिती उपलब्ध होणार आहे. चाफ्याची कंठी आणि विलोभनीय असं गणरायाचं रुप आता अॅपच्या माध्यमातून  सगळ्यांना पाहता येणार आहे.

या कार्यक्रमाला सिद्धीविनायक गणपती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत पारीख, महेश मुदलीयार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत, विशाखा राऊत, ॲङ पंकज गोरे, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, न्यासाच्या कार्यकारी अधिकारी प्रियंका छापवाले आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा...चालत्या-बोलत्या महालक्ष्मी.. सासूबाईनं केलं दोन्ही सुनांचं गौरी म्हणून पूजन!

सिद्धिविनायक मंदिरात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायाची आरती करण्यात आली. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने या क्षणांचा एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: August 28, 2020, 6:52 PM IST

ताज्या बातम्या