सच्चा कोरोना योद्धा! डॉक्टरनंच अ‍ॅम्ब्युलन्स चालवून वाचवले कोरोना रुग्णाचे प्राण

सच्चा कोरोना योद्धा! डॉक्टरनंच अ‍ॅम्ब्युलन्स चालवून वाचवले कोरोना रुग्णाचे प्राण

पुण्यात एका डॉक्टरच्या रुपात सच्चा कोरोना योद्धा समोर आला आहे.

  • Share this:

पुणे, 28 ऑगस्ट: पुण्यात एका डॉक्टरच्या रुपात सच्चा कोरोना योद्धा समोर आला आहे. कोरोनाबाधित वयोवृद्ध रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी पुण्यातील 30 वर्षीय डॉक्टरनं स्वत: अ‍ॅम्ब्युलन्स चालवली. एवढंच नाही तर वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचून रुग्णाचे प्राणही वाचवले. रंजीत निकम असं या डॉक्टरचं नाव असून त्यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

हेही वाचा...राष्ट्रवादीच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बोगस; शिवसेना नेत्याच्या पुत्राचा गंभीर आरोप

पुण्यातील मार्केटयार्ड येथील कोविड सेंटरमध्ये 71 वर्षीय रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा अचानक कमी झाली. त्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये तातडीनं हलवणं आवश्यक होतं. तेव्हा डॉ. रंजीत निकम यांनी स्वत: अ‍ॅम्ब्युलन्स चालवून रुग्णाला जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं.

डॉ. रंजीत निकम यांनी सांगितलं की, कोविड सेंटरच्या अ‍ॅम्ब्युलन्स चालक अचानक आजारी पडला होता. त्यात आजोबांची प्रकृती खालावली होती. त्यांना वेळेत उपचाराची आवशक्यता होती. या कामात त्यांना डॉ. राजेंद्र राजपुरोहित यांचे सहकार्य मिळाले.

मार्केटयार्ड परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये डॉ. रंजीत निकम आपलं कर्तव्य बजावत होते. मात्र, सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास एका कोरोनाबाधित वयोवृद्ध रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्र कमी झाल्याचं निदर्शनास आलं. वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर रुग्णाला एखाद्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, कोविड सेंटरच्या अॅम्ब्युलन्सचा चालक अचानक आजारी होता. गाडी चावण्याची त्याची परिस्थिती नव्हती.

हेही वाचा...गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणले नाही म्हणून पत्नीला मोबाइलवरच तिहेरी तलाक!

अखेर रुग्णाला सलाइन चढवण्यात आलं. रुग्णाची प्रकृती सातत्यानं खालावत होती. अखेर डॉ. रंजीत निकम यांनी स्वत: अ‍ॅम्ब्युलन्स चालवण्याचा निर्णय घेतला. रुग्णाला अनेक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, बहुताश हॉस्पिटलमध्य आयसीयू बेड शिल्लक नसल्याचं समजलं. अखेर रुग्णाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णावर वेळेच उपचार झाल्यामुळे त्याचे थोडक्यात प्राण बचावले. आता रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. रंजीत निकम यांनी दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 28, 2020, 6:23 PM IST

ताज्या बातम्या