चालत्या-बोलत्या महालक्ष्मी.. सासूबाईनं केलं दोन्ही सुनांचं गौरी म्हणून पूजन!

देशभरात गौरीचा ( महालक्ष्मी) सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

देशभरात गौरीचा ( महालक्ष्मी) सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

  • Share this:
वाशिम, 27 ऑगस्ट: देशभरात गौरीचा ( महालक्ष्मी) सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, वाशिम शहरातील सिंधुबाई सोनुने ही महिला चक्क आपल्या दोन्ही सुनांचं गौरी म्हणून त्यांचं पूजन करतात. यंदाही सिंधुबाईंनी मोठ्या उत्साहात चालत्या बोलत्या गौरींची स्थापना करून खरी लक्ष्मी ही सुनच असते, असा संदेश समाजाला दिला आहे. हेही वाचा...बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठावी म्हणून चक्क गणरायाला साकडं, पाहा फोटो... वाशिम शहरात राहणार्‍या श्रीमती सिंधुबाई सोनुने यांनी यावर्षी मंगळवारी आपल्या दोन्ही सुनांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणून मखरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं बसवत त्यांची पूजन करून उत्सव साजरा केला. सिंधूबाई सोनुने यांनी जिवंत चालत्या बोलत्या गौरी (महालक्ष्मी) अशा प्रकारे सोहळा साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. हा अनोखा गौरी पूजन सोहळा पाहण्यासाठी नागरिक एकच गर्दी केली होती. या गौरी सोहळ्यामधून सासू आणि सुनांमधील प्रेम, सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा, असा आपला उद्देश असल्याचं सिंधुबाई सोनुने यांनी सांगतलं आहे. घराघरात सासू आणि सुनेचं भांडण आपण नेहमीच बघतो. मात्र, वाशिम जिल्ह्यातील अशी एक सासू आहे. ज्या सासुबाईनं आपल्या दोन्ही सुनेचं चक्क गौरीच्या मखरात बसवून त्यांना गौरीचं रूप देत गौरींच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत त्यांची पूजा अर्चना केली. हेही वाचा...धक्कादायक! थोरल्यानं दारूच्या नशेत धाकट्याला संपवलं, शिवसेना वसाहतीतील थरार आमच्या सासूबाई आम्हा दोघींना प्रत्यक्ष गौरीचा मान देतात, याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचं या दोन्ही सिंधुबाईंच्या दोन्ही सुनांनी सांगितलं आहे. दरम्यान, गुरूवारी गौरीसोबतच सहा दिवसांच्या गणपती बाप्पांनाही भावपूर्ण निरोप दिली जात आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: