जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ''मला माझ्या शाळेतले दिवस आठवले'' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विद्यार्थी आणि शिक्षकांशी ऑनलाइन संवाद

''मला माझ्या शाळेतले दिवस आठवले'' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विद्यार्थी आणि शिक्षकांशी ऑनलाइन संवाद

''मला माझ्या शाळेतले दिवस आठवले'' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विद्यार्थी आणि शिक्षकांशी ऑनलाइन संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) विद्यार्थी आणि शिक्षकांशी (students and teachers) संवाद साधला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 ऑक्टोबर: जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा (School Reopen) आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचं अनेक ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) विद्यार्थी आणि शिक्षकांशी (students and teachers) संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणीही शेअर केल्या आहेत.

पुन्हा शाळेची घंटा वाजली आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील कठीण काळ सुरु आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय खुप अवघड होता. शाळेचे नाही तर आपल्या भविष्याच दार उघडलं आहे, हे उघडतांना खुप काळजीपूर्वक निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. हेही वाचा-  ढसाढसा रडत होता आर्यन खान! शाहरुख सोबत बोलला फोनवर यावेळी मुख्यमंत्र्यानी शिक्षकांना आणि पालकांना आपल्या मुलांची जबाबदारी घेण्याची विनंती केली आहे. शाळांची दारं, खिडक्या उघडी करा. मोकळं ढाकळं वातावरण ठेवा. शाळा परिसर निर्जंतुकीकरण करा. मुलांमध्ये अंतर ठेवण्याची काळजी घ्या, असंही ते म्हणाले. आपण एकदा उघडलेली शाळा पुन्हा बंद होऊ देणार नाहीत, याची आपण दक्षता घेऊ, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचा दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. हेही वाचा-  कचरा दिसताच प्रियांका गांधींनी हातात घेतली झाडू, झाडून काढली खोली; Viral Video आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. शिक्षकाला बरे वाटत नसेल तर त्याने लगेच चाचणी करून घ्यावी. पावसाळा अजून संपला नाही. साथीचे रोगही येतात. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेऊन सर्वानी काम करावे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. मुलं नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. आज आपण मुलांच्या विकासाचे , प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात