• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • Lakhimpur Kheri Violence LIVE Updates: कचरा दिसताच प्रियांका गांधींनी हातात घेतली झाडू, झाडून काढली नजरकैदेची खोली; Viral Video

Lakhimpur Kheri Violence LIVE Updates: कचरा दिसताच प्रियांका गांधींनी हातात घेतली झाडू, झाडून काढली नजरकैदेची खोली; Viral Video

दरम्यान प्रियांका गांधी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:
    लखनऊ, 04 ऑक्टोबर: आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. नवीन कृषी कायद्यांविरोधात (New Farm Law) आंदोलनाला (Farmers Protest) आता हिंसक वळण लागलं. (Fight between Farmers and BJP workers) शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशत्या लखीमपूर खीरीमध्ये (Lakhimpur Kheri Incident) केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या 2 कारला आग लावली. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना पोलिसांनी हरगावमध्येच अटक केली. दरम्यान प्रियांका गांधी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना अटक केल्याची माहिती युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी दिली आहे. दरम्यान प्रियांका गांधी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत प्रियांका गांधी झाडू मारताना दिसत आहेत. प्रियांका गांधी यांना ज्या पोलीस गेस्ट हाऊसच्या खोलीत ठेवण्यात आलं होतं. ती खोली प्रियांका गांधी यांनी साफ केली आहे. या खोलीचा कचरा काढताना व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे. या खोलीत प्रियांका गांधी यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. काय आहे नेमकी घटना मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य़ (Keshav Prasad Maurya) रविवारी लखीमपुर खीरीमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचं गाव बनवीरपुर येथे जात होते. त्यांनाच रिसीव्ह करण्यासाठी अजय मिश्रांचा मुलगा आशिष मिश्रा घरातून बाहेर पडले होते. याचदरम्यान आशिष मिश्रा आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका गाडीला शेतकऱ्यांनी अडवलं. शेतकरी त्यांच्याकडे नवीन कृषी कायदे माघारी घेण्याची मागणी करत होते. हेही वाचा- पुरानी दुश्मनी; परब vs कदम, रामदास कदमांना होणार शिक्षा? शेतकऱ्यांपासून वाचण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांनी ड्रायव्हरला स्पीड वाढवण्यास सांगून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काही शेतकरी गाडीच्या समोर आली. यामुळे 8 जणांचा मृत्यू झाला. यानंतर नाराज शेतकऱ्यांनी मंत्र्याच्या मुलाच्या दोन गाड्या पेटवून दिल्या (Farmers burned vehicles of BJP workers). केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी झी मीडियाशी बोलताना सांगितलं की, या घटनेत ठार झालेले 4 जण हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आरोप केला की, काही लोकांनी वाहनांवर दगडफेक केली आणि 4 लोकांना मारहाण केली. त्यांनी दावा केला, की घटनेच्या वेळी त्यांचा मुलगा घटनास्थळी नव्हता. याचे व्हिडिओ स्वरुपातील पुरावे त्यांच्याकडे आहेत. हेही वाचा- विरोधी पक्षनेत्यांचा पूरग्रस्त भागांचा दौरा, 'सामना'तून शिवसेनेची खोचक टिप्पणी या घटनेच 8 लोकांचा मृत्यू झाल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रात्री उशिरा लखनऊमध्ये मुख्य सचिन आणि डीजीपी यांच्यासोबत उच्चस्तरिय बैठक घेतली. त्यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले की, दोषींचा पर्दाफाश केला जाईल. यूपी सरकारने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की ते या घटनेच्या कारणांच्या तळाशी जाईल. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं सरकारनं सांगितलं. त्याचबरोबर जनतेला घरातच राहण्याचे आणि कोणाचीही दिशाभूल न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published: